विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर मध्य मतदारसंघ काँग्रेस नरसैय्या आडम मास्तरांसाठी सोडायला तयार नाही. पण तिथूनच निवडणूक लढवायचा निर्धार करून निवडून आल्यानंतर रामगिरी महाराजांना बेड्या ठोकायची भाषा आडम मास्तर यांनी केली. Adam Mastar congress solapur central ward
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसैय्या आडम मास्तर यांनी काँग्रेसला मदत केली. त्या बदल्यात सोलापूर मध्य मतदारसंघ विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला सोडायची अपेक्षा व्यक्त केली. खुद्द सोनिया गांधी आणि सीताराम येचुरी यांच्यात चर्चा झाल्याचा हवाला आडम मास्तर यांनी दिला, पण लोकसभा निवडणुकीचे काम झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आडम मास्तर यांना बधले नाहीत. उलट सोलापूर मध्य मतदारसंघावर काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीच दावा ठोकला.
Dushyant Chautala : हरियाणा दुष्यंत चौटाला अन् खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर दगडफेक
तरी देखील आडम मास्तर यांनी तिथून निवडणूक लढवायचा निर्धार व्यक्त करत ठिक ठिकाणी अल्पसंख्यांकांचे मळावे घेतले. या मेळाव्यांमध्ये भाषण करताना त्यांनी रामगिरी महाराजांना बेड्या ठोकण्याची भाषा केली. त्याचबरोबर नारायण राणेंच्या मुलाला माफी मागायला लावेन, अशी गर्जना केली. प्रत्यक्षात आडम मास्तर यांना काँग्रेस तो मतदारसंघ सोडणार की नाही??, आडम मास्तर निवडणूक लढवणार की नाही?? आणि त्यांनी निवडणूक लढवली, तरी ते निवडून येणार की नाही??, अशा सवालांच्या जंजाळात सोलापूर मध्य मतदारसंघ अडकला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more