पडद्यामागच्या – पडद्या पुढच्या चर्चांमध्ये पितृपंधरवडा सरला; आता उमेदवार याद्या जाहीर करण्यासाठी “मुहूर्त” गाठण्याची स्पर्धा!!

Competition

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या पडद्यामागच्या आणि पडद्या पुढच्या चर्चांमध्ये पितृपंधरवडा सरला. आता उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी “मुहूर्त” गाठण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. Competition to reach the mohurat for announcing candidate lists

पितृपंधरवड्या नंतर दुसऱ्याच दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होते. या नवरात्रामध्येच पहिल्या दिवसापासून ते दसऱ्याच्या मुहूर्त पर्यंत जास्तीत जास्त उमेदवार याद्या जाहीर करण्याची स्पर्धा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा केली. उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे घाटत असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत.


Dushyant Chautala : हरियाणा दुष्यंत चौटाला अन् खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर दगडफेक


यामध्ये भाजपचे 50, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 36 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 उमेदवार असण्याची शक्यता बातम्यांमध्ये वर्तवली आहे, पण ते काही असले तरी जर उद्या 100 उमेदवारांची यादी जाहीर होणार असेल, तर हे सगळे उमेदवार वादग्रस्त नसलेल्या जागांचे जाहीर होणार आहेत हे उघड आहे. पण यानिमित्ताने महाविकास आघाडीवर राजकीय कुरघोडी करण्याची संधी महायुती घेणार आहे.

महाविकास आघाडीच्या पडद्यामागच्या आणि पडद्या पुढच्या चर्चा पितृपंधरवड्यात रंगल्याच होत्या. शरद पवार आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते कितीही पुरोगामीत्वाचा आव आणून सनातन धर्मातील संतांची खिल्ली उडवत असले तरी पितृपंधरवड्यात उमेदवार यादी किंवा स्टार प्रचारकांची यादी किंवा जागावाटप जाहीर करायची त्यांची देखील हिंमत झाली नाही. दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची यादी जाहीर करण्याच्या बातम्या महाविकास आघाडीतील सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

याचा अर्थ जर महायुतीची यादी उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होणार असेल आणि दसऱ्याचा मुहूर्त महाविकास आघाडी गाठणार असेल, तर सुरुवातीच्या टप्प्यात उमेदवार यादी जाहीर करण्यात महायुतीने महाविकास आघाडीवर मात केल्याचेच चित्र निर्माण होणार आहे.

Competition to reach the mohurat for announcing candidate lists

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात