विशेष प्रतिनिधी
बीजिंग – चीनमध्ये सध्या डेल्टा संसर्गाने पाय पसरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे चीनच्या पूर्व भागात डालियान शहरात सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. येथील विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत कोरोनाचा प्रसार होऊ लागल्याने त्यांना बंदिस्त करण्यात आले आहेDelta variant spred rapidly in China
. गेल्या आठवड्यापासून डेल्टा व्हेरियंटचा प्रसार होत असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत चालली आहे.जगात कोरोनाचा उद्रेक घडवून आणणाऱ्या चीनमध्ये सुमारे दोन वर्षात एकूण बाधितांची संख्या केवळ ९८ हजार ३१५ एवढीच राहिली आहे. सरकारी आकडेवारीनुसार १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान डेल्टा व्हेरियंटचे देशात एकूण १३०८ प्रकरणे आढळून आले.
हा आकडा उन्हाळ्यात आढळलेल्या १२८० ने देखील अधिक आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ४६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील अन्य देशांचे आकडे मात्र चीनपेक्षा अधिक आहेत. अमेरिका, भारत, ब्राझीलचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
पण आता डेल्टा व्हेरियंट हा चीनमध्ये २१ प्रांतात पसरला आहे. त्यादृष्टीने चीन सरकारने गांभीर्याने पावले उचलली आहेत. चाचणी, तपासणी आणि बाधित लोकांची ओळख पटविण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे. कन्टेन्मेंट झोनमध्ये चाचणीची संख्या वाढवली आहे. तसेच मनोरंजन, सांस्कृतिक, पर्यटन आणि कार्यक्रम तसेच सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App