‘अनैक लव्हिंग लायब्ररी’ : ९ वर्षीय अनैकने कोव्हिड पेशन्टचे एकटेपण दूर करण्यासाठी सुरू केली मिनी लायब्ररी


विशेष प्रतिनिधी

अरिझोना : एलेन डीजेनरेसचा शो वर्ल्ड फेमस शो आहे. या शो मध्ये एका क्यूट मुलाने आपली हजेरी लावली होती. हा क्यूट, हँडसम पंजाबी बेबी बॉय जरी असला तरी त्याचे काम मात्र अतिशय मोठे आहे. कोरोना मुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असणाऱ्या पेशंटसचा एकटेपणा दूर व्हावा यासाठी त्याने एक मिनी लायब्ररी सुरू केली आहे. ‘अनैक लव्हिंग लायब्ररी’ असे त्याच्या मिनी लायब्ररीचे नाव आहे.

‘Anaik Loving Libraries’: 9-year-old Anaik launches mini-library to reduce loneliness of covid patients

अनैक सचदेव हा फक्त 9 वर्षांचा आहे. अरिझोना अमेरिकेत तो राहतो. कोव्हिड काळामध्ये त्याच्या आईला कोरोना झाला. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व लोकांना आयसोलेशनमध्ये रहावे लागले. त्यानंतर त्याच्या आजीला देखील कोरोना झाला. पण तिला हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. या तीन आठवड्यांमध्ये सर्व जण आपला वेळ पुस्तके वाचून घालवायचे. पण त्यांची आजी हॉस्पिटलमध्ये एकटी असल्यामुळे सर्वजण तिच्याशी फक्त व्हिडिओ कॉलवर बोलायचे.

https://www.instagram.com/tv/CW9VWGQDWCf/?utm_source=ig_web_copy_link

आपल्या आजीसोबत बोलायचा हा एकच मार्ग त्यांच्याकडे होता. त्यावेळी अनैकने विचार केला की, कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असणाऱ्या पेशंटना त्यांचा वेळ जावा आणि त्यांचे एकटेपण दूर व्हावे यासाठी एक छोटी लायब्ररी चालू करावी. म्हणून त्याने ही मिनी लव्हिंग लायब्ररी चालू केली. मागील एका वर्षात त्याने या लायब्ररीमध्ये 200 पुस्तके जमवली आहेत. ही लायब्ररी त्याने कोविड पेशंट आणि ज्यांच्याकडे घर नाहीत अशा लोकांसाठी चालू केली आहे.


मुंबईत कोविड पेशंटसाठी देवदूत बनली पुस्तके


आणि आता त्याला ह्या मिनी लायब्ररीचे एक्स्पान्शन करायचे आहे. त्यासाठी त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रॅप देखील शेअर केला आहे आणि हे रॅप सॉंग अतिशय क्यूट आहे.

https://www.instagram.com/tv/CWZGshRjdyu/?utm_source=ig_web_copy_link

एलेन डीजनरेशनने जेव्हा त्याला प्रश्न विचारला की तू मोठा झाल्यानंतर काय होशील? तेव्हा त्याने जाम क्युट उत्तर दिले. तो म्हणतो, मी मोठा झाल्याानंतर नॅशनल बास्केटबॉल प्लेअर बनेल किंवा रॅपर बनेल. या दोघांपैकी काही बनता नाही आले तर मी प्रेसिडेंट बनेल आणि जगामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेन आणि हे देखील नाही झाले तर मी अॅनास्थेशियालॉजिस्टिक होईल. How cute and smart know!!

‘Anaik Loving Libraries’: 9-year-old Anaik launches mini-library to reduce loneliness of covid patients

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात