मुंबईत कोविड पेशंटसाठी देवदूत बनली पुस्तके


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोविड पेशंटसाठी Let’s Read Foundation तर्फे कोविड सेंटरमध्ये लायब्ररी चालू करणेत आली आहे. ही कल्पना लोकांना खूप पसंत पडली आहे. मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि कोविड सेंटर्स मध्ये पेशंट वाढले. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी काळजी घेत होते व प्रशासन सोयी सुविधा उपलब्ध करण्यात मग्न होते. देशामध्ये दुःखी वातावरण झाले होते. पेशंटना दिलासा देणारे काही तरी हवे होते.

Angel’s library for Covid patients in Navi Mumbai

नवी मुंबई येथे लेट्स रीड फाऊंडेशन हे लोकांमध्ये वाचनाची आवड वाढावी म्हणून काम करत आहे. त्यांनी कोविड सेंटर्समध्ये लायब्ररी चालू करण्याची कल्पना मांडली. नवी मुंबईचे म्युनिसिपल कमिशनर अभिजित बनगर यांनी वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये अशी लायब्ररी चालू करण्याची परवानगी दिली आणि लेटअस रीड आणि NMMC ने लायब्ररी चालू केली. एका आठवड्यात या लायब्ररीला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी, हिंदी, इंग्रजीमधील उत्तम पुस्तके ठेवली गेली जी आयआयटी तील आजी माजी विद्यार्थ्यांनी निवडली होती. पेशंट पुस्तकांकडे आकर्षित झाले.  मोबाईल, सोशल मेडियामध्ये वेळ घालवण्यापेक्षा पेशंट पुस्तके वाचू लागले.


Maharashtra: #COVID19 tests being done on passengers arriving from Delhi, Goa, Rajasthan & Gujarat. Visuals from Pune Railway Station. A doctor says, “Passengers with high temperature undergoing Rapid Antigen Test; if positive, being shifted to hospital. We’re keeping record.”


आता सेंटरमधील रुग्णांची संख्या १४० आहे तरीपण लायब्ररी चालू आहे व पेशंटचा ओढा पुस्तक वाचनाकडे आहे. प्रफुल्ल वानखेडे हे Let’s Read Foundationचे संस्थापक आहेत. ते म्हणाले की, कोविड रुग्ण घरापासून दूर असतात व त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. आजाराबद्दल विचार करून ते निराश होऊ शकतात. निरनिराळ्या विषयांवरील पुस्तके दिल्यामुळे त्यांचा वेळ वाचनात जाऊं लागला व आजारांवर विचार करणे कमी झाले.

ही संस्था तीन वर्षांपूर्वी चालू झाली आहे. प्रियंका पवार या पेशंटने सांगितले की, “नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक वाचले. त्यात म.गांधी, लोकमान्य टिळक, गुलजार यांच्यासारख्या अनेक लोक पहिल्या प्रयत्नात कसे अपयशी ठरले होते आणि प्रयत्नांती कसे यशस्वी झाले ते यात लिहिले आहे.” पवार म्हणाल्या की “या पुस्तकामुळे मला कोविडविरूद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.”

विजय उमाटे यांनी Let’s Read Foundation व NMMC चे या उपक्रमाबद्दल आभार मानले. ते म्हणाले, “एपीजे अब्दुल कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायरमुळे त्यांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली आहे.”

Angel’s library for Covid patients in Navi Mumbai

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात