विशेष प्रतिनिधी
नाशिक : कोरोना महामारीचा काळ हा आपल्या सर्वांसाठीच एक सर्वात कठीण काळ ठरला होता. कोरोना पेशंटसाठी वेळेत बेड न मिळणे, ऑक्सिजनची कमतरता त्याचप्रमाणे औषधांची कमतरता अशा बऱ्याच गोष्टींचा सामना लोकांना करावा लागला होता. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून महानगरपालिका, नगरपालिका यांनी उपाययोजना करण्यासाठी सरकारकडून कोटीच्या कोटी रुपये आकारले होते.
Corona and greatest bills of nashik municipal corporation
नाशिक महानगरपालिकेने कोरोना प्रतिबंधक चाचण्यांवर एकूण साडे चौदा कोटी रुपये खर्च केले आहेत. पालिकेच्या आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे सर्वाधिकार देण्यात आले होते. या अधिकाराअंतर्गत प्रशासकीय यंत्रणेने कोरोना विषयक विविध सुविधा पुरविण्यासाठी खर्चात कुठलीच कसर सोडली नाही असे दिसून येते आहे. नाशिकमध्ये समाजकल्याण, ठक्कर डोम, मेरी तपोवन येथे कोयना सेंटर उभारण्यात आले हाेते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट चे प्रमाण देखील वाढविण्यात आले होते. त्यानंतर आरटी पीसीआर चाचणीदेखील बंधनकारक केली होती. या सर्व उपाययोजना करण्यामध्ये बराच मोठा खर्च करण्यात आला होता.
एसीबीने केली पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांना अटक
वैद्यकीय विभागाकडून एकूण 59.23 कोटी रुपये खर्च झाला आहे. तर एकूण चाचण्या करण्यावर 14.57 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तर तिसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेऊन दोन लाख रॅपिड अँटिजन किट खरेदी केल्या गेल्या आहेत. कोरोना तपासण्या करण्यासाठी बिटको रुग्णालयामध्ये मॉलेक्युलर लॅबदेखील उभारण्यात आली आहे. लॅबसाठी केमिकल किट व इतर साहित्य खरेदीसाठी 3.17 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर उपकरणांच्या खरेदीवर 29.99 लाख इतके रूपये खर्च केले आहेत. तर आरटीपीसी चाचण्यांचे साहित्यासाठी तीन लाख इतका खर्च करण्यात आला आहे.
हा झाला उपकरणांवरील खर्च. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्यामुळे वैद्यकीय विभागात मनुष्यबळाची कमतरता भासत होती. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी एकूण 19.27 कोटी रुपये खर्च करण्यात आला. नगरसेवकांना ऑक्सिजन काँट्रॅक्ट देण्यासाठी 4.55 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर पीएसए प्लान्ट उभारण्यासाठी 4.37 कोटी खर्च इतके रूपये खर्च करण्यात आले हाेते. ड्युरो ऑक्सिजन सिलिंडरसाठी 28.55 लाख इतका खर्च करण्यात आला होता. तर रेमडीसीवर टोसिलिझुमब इंजेक्शनसाठी 3 कोटी 57 लाख इतका खर्च करण्यात आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App