एसीबीने केली पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांना अटक


सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना बेड्या ठोकल्या आहे.ACB arrests police officer Sujata Patil


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली.

तक्रारदाराकडे १ लाखाची त्यांनी मागणी केली होती. ४० हजारांची लाच स्वीकारताना सुजाता पाटील यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.



काही महिन्यांपूर्वी सुजाता पाटील यांनी अस काही केलं की राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली होती. जेव्हा सुजाता पाटील हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदी होत्या तेव्हा त्यांनी
मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली होती.

पत्रात त्या म्हणाल्या होत्या की , बदली करतांना माझा विचारच करण्यात आला नाही, त्यातच मी कर्जबाजारी झाले असून माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या करणे किंवा राजीनामा देणे, हेच पर्याय.” यामुळे राज्यात खळबळ उडाली होती.

ACB arrests police officer Sujata Patil

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात