Controversial Mumbai CP : परमबीर सिंहच नाही, तर ‘या’ मुंबई पोलीस आयुक्तांचीही अचानक झाली होती बदली

सचिन वाझेंमुळे मुंबई पोलिसांची मोठी बदनामी झाली. (Controversial Mumbai CP)  त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबई आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून त्यांना कमी महत्त्वाचा असलेला होमगार्डचा पदभार दिला. ही महाराष्ट्रातील वेगळी घटना असली तरी एका अर्थाने नवीन नाही. याआधीही वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत असे झालेले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीतील पोलीस आयुक्त हे अतिशय पॉवरफुल पद आहे, परंतु नंतर वादांमुळे यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना कमी महत्त्वाच्या पदांवर ट्रान्सफर करून साइडलाइन करण्यात आलं आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : (Controversial Mumbai CP)  देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली आणि एका गुंतागुंतीच्या प्रकरणाला सुरुवात झाली. या स्फोटके प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे होता ते एपीआय सचिन वाझे यांचेच हात त्यात माखल्याचे एनआयएच्या तपासातून पुढे आले. याप्रकरणी सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, एवढा मोठी घटना घडली म्हटले की, त्याचे खापर कुणावर तरी फोडावेच लागते. झालेही तसेच, महाविकास आघाडी सरकारने मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची तडकाफडकी उचलबांगडी करून त्यांना होमगार्डमध्ये टाकले.

यामुळे स्वाभिमान दुखावलेल्या परमबीर सिंगांनी महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा पाढाच वाचून दाखवला. याकरिता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सविस्तर, अगदी बारीकसारीक तपशिलात पत्र लिहून पाठवले. या ‘परम’ पत्रामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतील बार-रेस्तराँमधून दरमहा 100 कोटींच्या हप्ता वसुलींचे टारगेट दिले होते, असा आरोप त्यांच्या पत्रातून करण्यात आला आहे.

सचिन वाझेंमुळे मुंबई पोलिसांची मोठी बदनामी झाली. त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबई आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून त्यांना कमी महत्त्वाचा असलेला होमगार्डचा पदभार दिला. ही महाराष्ट्रातील वेगळी घटना असली तरी एका अर्थाने नवीन नाही. याआधीही वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत असे झालेले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीतील पोलीस आयुक्त हे अतिशय पॉवरफुल पद आहे, परंतु नंतर वादांमुळे यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना कमी महत्त्वाच्या पदांवर ट्रान्सफर करून साइडलाइन करण्यात आलं आहे.

 Controversial Mumbai CP: Like IPS Parambir Singh these Mumbai Police Commissioners Also suddenly got Transfers

अरूप पटनायक

2011 ते 2012 या काळात IPS अरुप पटनायक यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार होता. त्यावेळी दिवंगत आर.आर. पाटील गृहमंत्री होते. मुंबईतील आझाद मैदानावर उसळलेल्या दंगलीप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचा बडगा उगारण्यात आला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यावेळी तत्कालीन गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरून मोठा वाद तयार झाला. तेव्हा आयपीएस अरूप पटनायक हे राजकीय षडयंत्राचे बळी ठरले, असे मत ज्युलियो रिबेरो तसेच बी. रमन यांनी व्यक्त केले होते.

 Controversial Mumbai CP: Like IPS Parambir Singh these Mumbai Police Commissioners Also suddenly got Transfers

सत्यपाल सिंग

23 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2014 या काळात सत्यपाल सिंग (सध्या भाजप खासदार) हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विरोधकांना अनेक वादग्रस्त मुद्दे दिल्याचा आरोप तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केला होता. सत्यपाल सिंग यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून बागपतमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदारही झाले. डार्विनचा सिद्धांत नाकारल्यानेही ते वादात सापडले होते.

 Controversial Mumbai CP: Like IPS Parambir Singh these Mumbai Police Commissioners Also suddenly got Transfers

राकेश मारिया

2014 ते 2015 या काळात राकेश मारिया हे मुंबई पोलिसांत आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी शीना बोरा हत्याकांड बाहेर काढल्यानंतर अचानक त्यांना बढती देऊन पद्धतशीरपणे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आजही रंगते. विशेष म्हणजे परमबीर सिंग यांच्याप्रमाणेच मारियांचीही बदली होमगार्डमध्ये करण्यात आली होती.

 Controversial Mumbai CP: Like IPS Parambir Singh these Mumbai Police Commissioners Also suddenly got Transfers

अहमद जावेद

2015 ते 2016 या काळात अहमद जावेद हे मुंबई पोलीस आयुक्त होते. राकेश मारिया यांची शीना बोनाप्रकरणी बदली झाल्यानंतर त्यांना या पदावर नियुक्ती मिळाली होती. यानंतर अहमद जावेद यांची नियुक्ती सौदी अरबच्या राजदूत म्हणून करण्यात आली. शाही कुटुंबात जन्म झालेल्या अहमद जावेद हे केवळ एक रुपया वेतन घेतात अशी अफवासुद्धा पसरली होती, परंतु याचे त्यांनी स्वत:च खंडन केले आहे.

 Controversial Mumbai CP: Like IPS Parambir Singh these Mumbai Police Commissioners Also suddenly got Transfers

परमबीर सिंह

29 फेब्रुवारी 2020 पासून परमबीर सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला होता. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याप्रकरणी वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना पाठीशी घातल्याचा त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांची थेट होमगार्डमध्ये बदली करण्यात आली.

 Controversial Mumbai CP: Like IPS Parambir Singh these Mumbai Police Commissioners Also suddenly got Transfers

हेमंत नगराळे

परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यावर सध्या मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना मार्च 2018 मध्ये हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधान परिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी दिले होते. विधान परिषदेच्या सभापतींच्या परवानगीविना कोणत्याही आमदारावर गुन्हे दाखल करता येत नाहीत. त्यामुळे नगराळेंसह उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*