पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकि जैन होताहेत विवाहबद्ध


विशेष प्रतिनिधी

मुबंई : अंकिता लोखंडे छोट्या पडद्यावरील एक गाजलेले नाव आहे. एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून तिला प्रसिध्दीच्या झोतात आणले होते. ही मालिका प्रचंड गाजली होती. आणि या मालिकेत तिने निभावलेले अर्चना हे पात्रदेखील खूप प्रसिद्ध झाले होते.

Pavitra Rishta fame actress Ankita Lokhande and Vicky Jain are getting married

याच मालिकेच्या शूटिंगदरम्यान अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांची जोडी जमली होती. रील लाईफ आणि रिअल लाईफ दोन्हीमध्ये हे कपल लोकांना प्रचंड आवडायचे. पण काही कारणाने सुशांत सिंग राजपूत आणि अंकिताचे ब्रेकअप झाले. त्यानंतर सुशांत सिंग राजपूतचे नाव क्रिती सेनॉन, रिया चक्रवर्ती या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले होते.


Sushant Singh Rajput Death Anniversary ! अंकिता लोखंडेने शेअर केल्या यादें ….फिर मिलेंगे चलते चलते…व्हिडीओ पाहून पाणावले डोळे


तर बातमी ही आहे की, अंकिता लोखंडे आपला लाँग टाईम बॉयफ्रेन्ड विकी जैन याच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. नुकताच तिने आपल्या लग्नातील विधींचे काही फोटोज सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. कारण बऱ्याच दिवसांपासून अंकिताचे चाहते तिच्या लग्नाची खुशखबर कधी येते ह्या बातमीच्या प्रतीक्षेत होते. मागील वर्षी अंकिता आणि विकिचा साखरपुडा झाला होता.

अंकिताने मणिकर्णिका या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती पवित्र रिश्ता सीझन 2 या मालिकेमध्ये काम करताना दिसून येतेय. तर विकी एक बिझनेसमन आहे.

Pavitra Rishta fame actress Ankita Lokhande and Vicky Jain are getting married

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण