चायना मेड लस ठरली बोगस, लस प्रभावी नसल्याची खुद्द चीन सरकारकडूनच कबुली. जगात खळबळ


 

बीजिंग – चीनमध्ये बनविलेला माल म्हणजे बनावट, बोगस अशी आपल्याकडे ख्यातीच आहे. त्यामुळे या मालाची तसेच चीनी वस्तूची गॅरंटी कोणताच विक्रेला तुम्हा कधी देत नाही. कारण त्यालाच याची आधी शंका असते. चीनने बनविलेल्या कोरनावरील लशीबाबातही चक्क असेच घडले आहे. या लशींची परिणामकारकता कमी असल्याची कबुली खुद्द चीननेच आता दिल्याने खळबळ उडाली आहे. China says inefficiency of own made vaccine

चीनमधील सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेल्या लशीची परिणामकारकता केवळ ५०.४ टक्के असल्याचे ब्राझीलमधील संशोधकांनी सांगितले आहे. याउलट अमेरिकेतील फायझर कंपनीची लस ९७ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. चीनने अद्यापही विदेशी बनावटीच्या लशींना परवानगी दिलेली नाही.



चीनचे लस अधिकारी गाओ फु यांनीच लशीच्या परिणामकारकतेबाबत माहिती दिल्याने सारेच बुचकळ्यात पडले आहेत. परिणामकारकता वाढविण्यासाठी लशी एकत्र करण्याचा विचार केला जात आहे. शिवाय, इतर लशींचाही लसीकरणात वापर करण्याबाबत चर्चा सुरु आहे.

China says inefficiency of own made vaccine


वाचा…

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात