रॉकस्टार सिनेमाला प्रदर्शित होऊन आज 10 वर्ष झाली पूर्ण


विशेष प्रतिनिधी

मुंबई : इम्तियाज अली यांचा रॉकस्टार हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. ए आर रेहमान यांनी म्युझिक दिलेला रॉकस्टार हा आजवरचा बॉलीवूडमधील सर्वात बेस्ट सिनेमा आहे असं म्हणायला हरकत नाही. इर्शाद कमिल यांनी लिहिलेले लिरिक्स आजही आपल्याला भुरळ पाडतात. तर मोहित चौहान यांचा आवाज एक इंटर्नल व्हॉइस आहे असंच वाटतं.

Today marks the 10th anniversary of the release of Rockstar Cinema

नर्गिस फाक्री आणि रणबीर कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा एक गाजलेला सिनेमा होता. बऱ्याच लोकांनी या सिनेमावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या. बऱ्याच लोकांना हा सिनेमा अतिशय आवडतो तर काहींना अजिबात आवडत नाही. अर्जुन रेड्डी बद्दलची कॉन्ट्रोवर्सी झाली होती तीच कॉन्ट्रोव्हर्सी या सिनेमाबद्दल झाली होती. सेल्फ डिस्ट्रक्शन हा मुद्दा या सिनेमामध्ये दाखविण्यात आला होता.

या सिनेमा मधील सड्डा हक या गाण्यावर देखील बरीच मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. यामधील सिंगर स्वत:च्या आयुष्याला वैतागलेला आहे. त्यामुळे तो कोणता अधिकार मागतोय? कोणाकडून मागतोय? कशासाठी मागतो? हे त्यालाही माहीत होते की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. असे स्वतः दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यामुळे त्यांनी या कॅरेक्टरला एक स्टुपीड बॉय असे देखील म्हणाले होते.


इम्तियाजच्या सिनेमातील आपलीशी वाटणारी स्त्री पात्रे


सिनेमातील जॉर्डन हा बाह्य जगातील मटेरिअलिस्टिक वस्तूंकडे आकर्षित न होणारा, फॅन्सी जगासोबत कोणतंही नातं न जोडणारा, काळासोबत न चालणारा एकदम ‘रॉ’ माणूस दाखवला गेला आहे. आणि हेच कारण असावे की रॉकस्टार मधील जॉर्डनचे चाहते जगभर पसरले आहेत. असे देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

काहीही असो, रॉकस्टार हा सिनेमा कितीही वेळा पहिला तरी अजिबात बोर नाही होत. आणि कहाणी ऐकून एकदाही सिनेमा न पाहण्याची इच्छा होणारे लोकही कमी नाहीयेत. हे ही तितकेच खरे आहे.

Today marks the 10th anniversary of the release of Rockstar Cinema

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात