विशेष प्रतिनिधी
मुंबई : अक्षयकुमार याने भारताचा सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृथ्वीराज चौहान यांची भुमिका केली आहे. मानुषी चिल्लार, संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. दोन वर्षांपूर्वी हा चित्रपट सेटवर गेला तेंव्हाच या चित्रपटाकडून भव्यतेची अपेक्षा होती. टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की हा अनुभव भारी असणार आहे. हा चित्रपट एका महान ऐतिहासिक योद्ध्याच्या जीवनावर आधारित आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन केले आहे. द्विवेदी यांनी ९०च्या दशकात चाणक्य सारखे जबरदस्त सिरीयल केले होते.
The teaser of Prithviraj movie has been released
यातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या एका आदेशावर लोक आपले जीवन समर्पित करत असत ते कळते. पृथ्वीराज चौहान यांचे शाही जीवन, शौर्य यांचे दर्शन घडणार आहे. पृथ्वीराज याना भारतातील एक पराक्रमी राजा म्हणून ओळखले जाते. महम्मद घोरी व पृथ्वीराज चौहान यांच्यातील युद्ध हा एक महत्त्वाचा भाग आहे.
संजय दत्त, सोनू सूद जे महत्वपूर्ण भूमिका करत आहेत ते या टिजरमध्ये दिसतात. मानुषी चिल्लार या चित्रपटातून पदार्पण करत आहेत व संयोगिता म्हणजे पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. यात आशुतोष राणा, साक्षी तन्वर, मानव वीज, ललीत तिवारी यांच्याही भूमिका आहेत.
Akshay Kumar : स्वातंत्र्याची 75 वर्ष ! सैनिकांसोबत जोरदार भांगडा ; खिलाडी कुमार काश्मीरमध्ये ; शाळेसाठी 1 कोटींची देणगी
अक्षयकुमार ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारतो हे बघायचे आहे. अर्थात अक्षय कुमार आपली छाप पाडणार हे नक्की. या चित्रपटात राजाची खंबीरता दाखवणारे संवाद आहेत व युद्ध प्रसंग आहेत. पृथ्वीराज चौहान हा भय माहिती नसलेला शूर राजा होता. अक्षयकुमार म्हणाला की हा चित्रपट राजाला सन्मान करणारा आहे. मी जसे राजाबद्दल वाचत गेलो तसे मला त्याची महानता कळली व देश व तत्वासाठी जगणे म्हणजे काय ते कळले. आम्हाला खात्री आहे की, या पराक्रमी राजाला भारतीय सलाम करतील. आम्ही शक्य तितक्या प्रामाणिकपणे ही शौर्य व धैर्याची कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
यशराज फिल्म्स निर्मित हा चित्रपट २०१९ साली सुरू झाला पण कोरोनामुळे शुटिंग थांबले होते. आता हा सिनेमा २१ जानेवारी २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App