Akshay Kumar : स्वातंत्र्याची 75 वर्ष ! सैनिकांसोबत जोरदार भांगडा ; खिलाडी कुमार काश्मीरमध्ये ; शाळेसाठी 1 कोटींची देणगी


‘देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी दाखल होत आहे आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा सीमेचे रक्षण करणाऱ्या देशातील शूर सैनिकांना भेटायला .


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या काश्मीरमध्ये पोहोचला आहे. गुरुवारी अक्षय कुमारने भारतीय सैन्य दलाच्या सैनिकांशी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत भांगडा नृत्यही केले.


अक्षयने काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील नीरू गावात शाळा बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगीही दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार काश्मीरमध्ये पोहोचला. गुरुवारी अक्षय कुमारने भारतीय सैन्य दलाच्या सैनिकांशी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत भांगडा नृत्यही केले. अक्षयने काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील नीरू गावात शाळा बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगीही दिली आहे. अक्षय कुमारने गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील नीरू गावाला भेट दिली होती .Akshay Kumar: 75 years of independence! A violent quarrel with the soldiers; Khiladi Kumar in Kashmir; 1 crore donation for school

गावाला भेट दिल्यानंतर अक्षय कुमारने शाळेसाठी एक कोटी रुपये देण्याचे ठरवले. या दरम्यान अक्षयने नीरू गावातच सीमा सुरक्षा दलासह भारतीय सैन्य दलाच्या इतर सैनिकांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. जवळच बीएसएफचे युनिटची पोस्ट आहे, तिथे अक्षयने भारतीय सैनिक आणि स्थानिक लोकांसह जोरदार भांगडाही केला.

बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अक्षय कुमार आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये राकेश अस्थाना आणि अक्षय कुमार हे देशातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना बीएसएफने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांनी एका समारंभात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सीमा रक्षकांना पुष्पांजली वाहिली. यावेळी अभिनेता अक्षय कुमारही डीजी बीएसएफसमवेत हजर होते आणि वीर शहिदांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

त्याचवेळी बीएसएफ काश्मीरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण बीएसएफ जवानांनसह अक्षय कुमार पाहू शकता. त्यांनी अक्षय कुमारचे फुलांनी स्वागत केले. हा व्हिडीओ शेअर करताना बीएसएफ काश्मीरने लिहिले की, ‘देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी दाखल होत आहे आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा सीमेचे रक्षण करणाऱ्या देशातील शूर सैनिकांना भेटायला आले आहेत.

Akshay Kumar : 75 years of independence! A violent quarrel with the soldiers; Khiladi Kumar in Kashmir; 1 crore donation for school

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात