द्रमुकला भगव्या रंगाचा इतका तिटकारा, संत थिरूवल्लूर यांची भगव्या वस्त्रातील पोस्टर हटविले


द्रवीड मुनेत्र कळघम पक्षाला भगव्या रंगाची इतका तिटकारा निर्माण झाला आहे की कोइंबतूर येथील लायब्ररीतून तामीळ संत कवी थिरूवल्लूर यांची भगव्या वस्त्रातील प्रतिमा हटविण्यात आली. याठिकाणी पांढरे वस्त्र परिधान केलेले प्रतिमा लावण्यात आली. द्रुमुकने ही प्रतिमा अधिकृत असल्याचे जाहीर केले आहे.DMK is so disgusted with saffron color, saffron poster of Saint Thiruvallur deleted


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : द्रवीड मुनेत्र कळघम पक्षाला भगव्या रंगाची इतका तिटकारा निर्माण झाला आहे की कोइंबतूर येथील लायब्ररीतून तामीळ संत कवी थिरूवल्लूर यांची भगव्या वस्त्रातील प्रतिमा हटविण्यात आली. याठिकाणी पांढरे वस्त्र परिधान केलेले प्रतिमा लावण्यात आली. द्रुमुकने ही प्रतिमा अधिकृत असल्याचे जाहीर केले आहे.

तामीळनाडूतील कोइंबतूर येथील कृषि विद्यापीठातील लायब्ररीमध्ये संत थिरूवल्लूर यांची प्रतिमा होती. मात्र, ही हटविण्यात आली. तामीळनाडूचे कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री एमआरके पनीरसेल्वम यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले, माझ्या भेटीमध्ये ही वादग्रस्त प्रतिमा दिसली. त्यामुळे तातडीने काढून टाकण्यात आली आहे.



या प्रतिमेमध्ये काळेभोर केस आणि दाढी असलेले संत थिरुवल्लूर यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. हे हटवून शासकीय अधिकाऱ्यांनी राज्य शासनाने अधिकृत केलेली अय्यन थिरुवल्लूर यांची पांढरी वस्त्रे असलेली प्रतिमा त्याठिकाणी लावली.

तामीळनाडूमध्ये संत थिरूवल्लूर यांच्या भगव्या वस्त्रातील प्रतिमा नव्या नाहीत. अनेक ठिकाणी या प्रतिमा दिसतात. परंतु, द्रुमुकला भगव्या रंगात हिंदूत्व दिसत असल्याने त्यांचा राग आहे. त्यामुळे द्रुमुककडून या वादात विरोधी पक्ष असलेल्या अखिल भारतीय द्रविड मुनेत्र कळघमलाही (एआयएडीएमके) ओढण्यात आले आहे.

एआयएडीएमकेने तामीळनाडूचे भगवेकरण केल्याचा आरोप पनीरसेल्वम यांनी केला आहे. हटविलेली प्रतिमा २०१७ ते २०१८ काळातील असल्याचा त्यांचा आरोप आहे. या काळात तामीळनाडूमध्ये एआयएडीएमके सत्तेवर होती.

DMK is so disgusted with saffron color, saffron poster of Saint Thiruvallur deleted

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात