दिपविर : बॉलिवूड मधील सूंदर पॉवर कपल दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाची तिसरी अ‍ॅनिव्हर्सरी

विशेष प्रतिनिधी

मुबंई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनी रामलीला या चित्रपटामध्ये सर्वात प्रथम एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटली येथे लग्न केले. आज त्याच्या लग्नाची तिसरी अॅनिव्हर्सरी आहे. लग्न करण्याआधी ते 6 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Deepveer: Bollywood’s beautiful power couple Deepika and Ranveer’s third wedding anniversary

त्यांची सर्वात पहिली भेट ही सिंगापूरमधील एका अवॉर्ड शोमध्ये झाली होती. त्यावेळी रणवीर सिंग अनुष्का शर्माला डेट करत होता तर दीपिका पदुकोणचे माल्ल्यासोबत ब्रेकअप झाले होते.

पहिल्या भेटीनंतरच रणवीर सिंगने दीपिका पदुकोण सोबत फ्लर्ट करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी दीपिकाने एक दिवशी वैतागून त्याला विचारले होते, जेव्हा तू दुसर्या मुलीला डेट करतोयस तर माझ्यासोबत का फ्लर्ट करतो? पण रणवीर सिंगने मात्र तिच्यासोबत फ्लर्ट करण्याचा एकही चान्स सोडला नव्हता.

संजय लीला भन्साळींनी या दोघांना ‘रामलीला’ या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली आणि येथून त्यांच्या दोघांची जर्नी सुरू झाली.


रणवीर, दीपिकाला अलिबागची भुरळ तब्बल ९० गुंठे जागा २२ कोटींना केली खरेदी


चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणवीर सिंगला डेंगू झाला होता. तेव्हा दीपिका आपल्या सर्व शूटिंग अपॉइंटमेंट कॅन्सल करून त्याची काळजी घेण्यासाठी आली होती. तेव्हा पासून ह्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा मीडिया मध्ये होण्यास सुरुवात झाली होती.

रामलीला या चित्रपटानंतर दोघांनी बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. बाजीराव मस्तानीमधील दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ पाडली होती.

अवॉर्ड शो असो किंवा कोणताही सोहळा असो किंवा पब्लिक अपियरन्स असो. दोघेही एकमेकांना प्रचंड रेस्पेक्ट देताना दिसून येतात. या सुंदर पॉवर कपलचे चाहते जगभर आहेत.

1983 साली भारताने वर्ल्डकप जिंकला होता. या मॅचवर आधारित लवकरच एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर त्याच्या बायकोची भूमिका दीपिकाने साकारली आहे. लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा त्या दोघांनी एकत्र काम केलेला चौथा सिनेमा असेल.

Deepveer: Bollywood’s beautiful power couple Deepika and Ranveer’s third wedding anniversary

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात