WATCH : मलावीमधील आंबा मुंबईच्या बाजारात किलोचा दर १२०० रुपये; हापूससारखीच चव


विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी देशातील आंब्याची आवक झाली. पहिल्या दिवशी २३० बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. घाऊक बाजारामध्ये १,२०० ते १,५०० रुपये किलो दराने हा आंबा विकला जात असून, १५ डिसेंबरपर्यंत याचा हंगाम सुरू राहणार आहे.

दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा मागील काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागला आहे. हापूससारखी चव, रंग व आकार असलेला हा आंबा दिवाळीच्या दरम्यान मार्केटमध्ये येत असल्यामुळे ग्राहकांचीही त्याला पसंती मिळते. २३० बॉक्स मुंबई बाजार समितीमध्ये आले आहेत. तीन किलो वजनाचा एक बॉक्स असून, त्यामध्ये ९ ते १२ आंबे बसतात. एका पेटी ची किंमत ३६००ते ४५०० इतकी आहे

यावर्षी हवाई वाहतुकीवरील खर्च वाढल्यामुळे मलावी आंबा ग्राहकांना जादा दराने विकत घ्यावा लागणार आहे. पहिल्या दिवशी होलसेल मार्केटमध्ये १२०० ते १५०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. मुंबईमध्ये १५ डिसेंबरपर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असून पुढील एक महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.

४०० एकरवर आंबा उत्पादन

मलावी देशात कोकणाप्रमाणे वातावरण आहे. तेथील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये हापूस आंब्याची रोपे नेली होती. तेथे ४०० एकरमध्ये आंबा लागवड करण्यात आली आहे. एक एकरमध्ये ४०० रोपे लावण्यात आली आहेत. नोव्हेंबरमध्ये तेथील आंबा तयार होत असून तो भारतासह इतर देशात विक्रीसाठी पाठविला जातो. कोकणच्या हापूसची चव असल्यामुळे ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

– मलावीमधील आंबा मुंबईच्या बाजारात

– दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा

– कोकणातील हापूससारखीच चव

– मागील काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येतो

– मलावी देशात कोकणाप्रमाणे वातावरण

– ४०० एकरवर आंबा उत्पादन

– एक एकरमध्ये ४०० रोपे लावण्यात आली

Mango from Malawi enters Mumbai market at Rs. 1200 per kg; Tastes like hapus

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात