कोरोना फैलावणाऱ्या ६१९ परकीय नागरिकांना आतापर्यंत अटक; सर्वाधिक म्होरके तबलिगी जमातीचे


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : भारतभर फिरून कोरोना व्हायरस फैलावणाऱ्या ६१९ परकीय नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यापैकी बहुसंख्य म्होरके तबलिगी जमातीशी संबंधित आहेत.
या सर्वांवर व्हिसा नियम तोडून देशभर फिरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश यांच्यासह १६ देशांमधील नागरिकांचा यात समावेश आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १६ परकीय नागरिकांना अटक करून नैनीतालमधील तुरुंगात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. अलाहाबाद विद्यापीठाच्या प्रोफेसरने २१ तबलिगींच्या राहण्या खाण्याची व्यवस्था केली होती. त्यांची माहिती प्रोफेसरने पोलिसांपासून लपवून ठेवली होती. त्यालाही अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत सर्वाधिक ३४१ परकीय नागरिकांना उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमधून, तर त्या खालोखाल १५७ परकीय नागरिकांना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमधून अटक करण्यात आली आहे. बिहारमधून ६६, कर्नाटकातून ४३ तर झारखंडमधून २१ परकीय नागरिक पकडले गेले आहेत. केंद्र व राज्य सरकारे नोंदीनुसार अजून ९०० परकीय नागरिकांचा शोध घेत आहे. अटक केलेले बहुसंख्य परकीय नागरिक आणि सरकार शोधत असलेल्यांपैकी बहुसंख्य परकीय नागरिक हे निजामुद्दीनच्या मरकजमधील तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सामील झाले होते.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात