वृत्तसंस्था
लंडन : कॅनडाच्या पंतप्रधानांपाठोपाठ ब्रिटनमधील खासदारांनी भारतातील शेतकरी आंदोलनात नाक खुपसले आहे. ब्रिटनमधील ३६ खासदारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तिथल्या लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंग धेसी यांच्या नेतृत्वाखाली ३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनचे कॉमनवेल्थ आणि परराष्ट्रमंत्री डोमिनिक रॉब यांना याबाबत पत्र लिहिले आहे. ब्रिटनने भारतातील कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची आणि पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाने भारत सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी पत्रातून केली आहे. farmer agitation news
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अशाच प्रकारे शेतकरी आंदोलनात नाक खुपसले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ताबडतोब कॅनडाकडे त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला. त्यानंतर ब्रिटनमधील खासदारांनी अशाच प्रकारे भारतातील आंदोलनात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला आहे. farmer agitation news
तनमनजीत सिंग म्हणाले, “गेल्या महिन्यात अनेक खासदारांनी आपल्याला तसेच लंडनमधील भारतीय उच्चायोगाला भारताती तीन कृषी कायद्यांबाबत लिहिले होतं. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात आणलेले हे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्या पिकांना योग्य मोबदला देण्यास अपयशी ठरल्याबद्दल शेतकरी निषेध आंदोलन करत आहेत. हा विषय ब्रिटनमधील शीख आणि पंजाबशी निगडीत असलेल्या लोकांसाठी विशेष चिंतेचा विषय आहे. हा कायदा भारतातील इतर राज्यांसाठीही अडचणीचा ठरत आहे. अनेक ब्रिटिश शीख आणि पंजाबी लोकांनी आपल्या खासदारांसोबत या प्रकरणी आवाज उठवला आहे. कारण पंजाबमधील त्यांच्या कुटुंबीयांना याची झळ बसणार आहे.
खासदारांनी केली होती ऑनलाइन बैठक
या कायद्यांविरोधात २८ नोव्हेंबर २०२० रोजी तनमजीत सिंग यांनी ऑल पार्टी पार्लिमेंटरी ग्रुप फॉर ब्रिटिश शीख यांची ऑनलाइन बैठक बोलावली होती. यामध्ये १४ खासदाारांनी सहभाग घेतला. तसेच ६० खासदारांनी सहभागी होऊ शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या बैठकीत ब्रिटिश सरकारने भारताशी चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
ब्रिटिश सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्या
खासदारांच्या स्वाक्षऱ्या
भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना ज्या ब्रिटिश खासदारांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये डेबी अब्राहम, मार्टिन डॉकर्टी ह्युजेस, एलन डोरांस, अँड्रूयू ग्वेने, अफजल खान, इयान लावेरी, इमा लावेरी, क्लाइव लेविस, टोनी लॉयड, खालिद महमूद, सीमा मल्होत्रा, स्टीव मैककेब, डॉन मैकडोनेल, पॅट मैकफेडेन, ग्राहम मोरिस, कार्लेइन नौर्स आदींचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more