वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सुरू असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत, असा घरचा आहेर खलिस्तानवाद्यांनी हत्या केलेले माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांचे नातू काँग्रेसचे लुधियानाचे खासदार रवनीत बिट्टू यांनी काँग्रेसला दिला आहे. ज्यांची इतर आंदोलने अपयशी ठरली आहेत ते आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊ पाहत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. congress mp says
काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग हे या आंदोलनाचे कट्टर समर्थक आहेत. या पार्श्वभूमीवर रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या मुलींना शिवीगाळ केली जाते. हे कसले पंजाब आहे? पंजाबमधील लोक असे करू शकत नाहीत. पंजाबमधील शेतकरी असे करू शकत नाहीत. ‘ठोक देंगे’ ही पंजाबची भाषा नाही आहे. अशी भाषा वापरणारे गुंड, अतिरेकी आणि असामाजिक तत्व आहेत.congress mp says
पंतप्रधानांना मारू किंवा अन्य कुणाला मारू, अशी भाषा शेतकरी करू शकत नाहीत. मी या आंदोलनामध्ये हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या लोकांना फिरताना पाहिले आहे. एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, की शेतकरी शांततेने आंदोलनाला बसले आहेत. तीन महिने पंजाबमध्ये आंदोलन सुरू असताना काही झाले नाही. पंजाब सरकारने हे आंदोलन शांततेने व्हावे यासाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीसह पाच ते पन्नास हजार जण आहेत. हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. आता नेत्यांनी पुढे येऊन यावर नियंत्रण मिळवले पाहिजे कारण अनेक जण हे आंदोलन अपयशी करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहच हे आंदोलन थांबवू शकतात. शेतकऱ्यांनाही तसेच वाटते. शेतकऱ्यांचा ना कृषिमंत्र्यांवर विश्वास आहे. ना अन्य कुणावर, असे बिट्टू यांनी स्पष्ट केले.
रवनीत सिंह बिट्टू हे काँग्रेसचे तरुण नेते आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लुधियाना येथून निवडून आले आहेत. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. मुख्यमंत्री असताना बेअंत सिंह यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App