एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले


  • सीरम आणि हैदराबादच्या भारत बायोटेकच्या लशीला परवानगी नाकारल्याचे दिले होते वृत्त

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापरासाठी देशातील अनेक कंपन्यांनी प्रस्ताव पाठविले होते. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांसोबतच संपूर्ण जगामध्ये आशेची लहर पसरली आहे. मात्र, एनडीटीव्हीने आपल्या फेक न्यूजने या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न केला. लसीच्या वापराचा प्रस्ताव मंजूर झाला नाही, असे खोटे वृत्त देण्यात आले. मात्र, आरोग्य मंत्रालयाने हे वृत्त फेटाळले आहे.  NDTV’s fake news tries to eclipse the hopes of billions

 

करोना प्रतिबंधक लसीचा आपातकालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने प्रस्ताव पाठवले होते. पण हे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत, असे धडधडीत खोटे वृत्त एनडीटीव्हीने दिले. प्रत्यक्षात असा कोणताही अहवाल दिलेला नाही. याबााबतचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आता आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे एनडीटीव्हीतर्फ सांगण्यात आले होते. NDTV’s fake news tries to eclipse the hopes of billions


एनडीटीव्हीने म्हटले होते, लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेबद्दल पुरेशी माहिती दिलेली नाही, त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. त्यांना आणखी माहिती देण्यासाठी सांगितलं आहे, अशी बातमी देण्यात आली होती. मात्र या बातमीत कुठलेच तथ्य नाही अशा प्रकारे कोणतीही संमती नाकारण्यात आलेली नाही असे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात पुढील वर्षीपर्यंत चीनी व्हायरसवर लस, डॉ. हर्ष वर्धन म्हणतात सुरक्षा चाचणीसाठी पहिली लस मीच घेईन

फायझर, सीरम आणि भारत बायोटेकच्या अजार्चा आढावा घेतला. अनेक बैठका ही एक ठरलेली स्टँडर्ड प्रॅक्टीस आहे. एक ते दोन आठवडे ही प्रक्रिया चालेल, असे सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील सूत्राने सांगितले.

NDTV’s fake news tries to eclipse the hopes of billions

सध्यातरी लस हाच या आजाराला रोखण्यााच एकमेव मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काल एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना आता लसीची जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे सांगितले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय