विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता चक्क रस्ताच वाजवेल हॉर्न, नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार


ट्रकच्या मागे हॉर्न प्लीज असे लिहिलेले आपण नेहमीच बघतो. मागून येणाऱ्या वाहनाने हॉर्न वाजवावा अशी अगदी माफक पण फार महत्वाची अपेक्षा यामागे असते. कारण यामुळे संभाव्य अपघात टळण्यास मदत होते. परंतु आता असे करण्याची भविष्यात घरजही पडणार नाही. कारण जग वेगाने बदलत आहे. हॉर्नबाबत एक नवे तंत्रज्ञान विकसित झाले असून याद्वारे वाहन नाहीतर रस्तेच हॉर्न वाजवतील अशी व्यवस्था केली जात आहे. महामार्गांवरील सुरक्षा वाढविण्याकरिता ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. Science Destinations: The Horn, the Invention of New Technology

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर याची यशस्वी चाचणीही पार पडली आहे. हा देशातील अत्याधिक धोकादायक महामार्ग समजला जातो. या प्रणालीअंतर्गत रस्त्यांच्या वळणाजवळ स्मार्टलाईफ पोल्स बसविण्यात येतात. हे पोल कुठल्याही तारेशिवाय एकमेकांना जोडण्यात आले आहे. वाहतुकीदरम्यान वाहनाचा वेग लक्षात घेऊन हे पोल्स हॉर्न वाजवून चालकांना सतर्क करतात. ही प्रणाली लावण्यात आल्यावर रस्त्यांवरील अपघात कमी होतील, अशी अपेक्षा आहे. कारण सध्या देशात रस्त्यांचा विकास मोठ्या गतीने होत आहे. मात्र गुळगुळीत व चांगल्या रस्त्यावर वाहनांच्या भरधाव वेगामुळे अपघात होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. त्याला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न व संशोधन होत आहे. पोल्स हॉर्न हा त्यातील महत्वाचा टप्पा असल्याचे मानले जाते.

Science Destinations: The Horn, the Invention of New Technology

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात