PUNJAB POLITICS: ठोको ताली ! काँग्रेस हायकमांडने नाही स्विकारला सिद्धू यांचा राजीनामा! प्रदेश काँग्रेसला दिले निर्देश…

  • काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. तेव्हापासून सिद्धूवर सुपर सीएम असल्याचा आरोप होत होता. 

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादात पक्षाचे प्रमुख नवजोत सिद्धू यांनी मंगळवारी 72 दिवसांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. तेव्हापासून सिद्धूवर सुपर सीएम असल्याचा आरोप होत होता. दुसरीकडे, हायकमांडने नवज्योतसिंग सिद्धू यांचा राजीनामा फेटाळला आहे.PUNJAB POLITICS: Clap your hands! Congress high command does not accept Sidhu’s resignation! Instructions given to Pradesh Congress …

नवज्योतसिंग सिद्धूंनी यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या राजकारणात वेगवान घडामोडी

सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर रजिया सुल्ताना यांनीही मंत्रिमंडळातून दिला राजीनामा

पंजाबचे आणखी बरेच नेते सिद्धूच्या समर्थनासाठी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती

रझिया सुल्ताना यांच्यासोबतच योगेंद्र धिंग्रा यांनीही दिला प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

सिद्धू यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे राज्य कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांचाही राजीनामा

मात्र काँग्रेस हाय कमांडने सिद्धू यांचा राजीनामा स्विकारला नसल्याची एएनआयची माहिती

सिद्धूचा राजीनामा फेटाळला

काँग्रेसच्या हायकमांडने नवज्योतसिंह सिद्धू यांचा राजीनामा स्वीकारला नाही.  राज्य नेतृत्वाला हे प्रकरण त्यांच्या स्तरावर सोडवण्यास सांगितले आहे.

पंजाबच्या राजकारणात उलथापालथ सुरूच आहे. मंगळवारी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली .

PUNJAB POLITICS: Clap your hands! Congress high command does not accept Sidhu’s resignation! Instructions given to Pradesh Congress …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात