वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, चित्रा वाघ यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी

पुणे:  पैसे खाणाऱ्या वाघाची पैसे खाणारी वाघीण अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली होती.वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, अशा शब्दांत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले आहे.I am a tiger and dont afraid of foxes and dogs, said BJP’s Chitra Wagh

पैसे खाणाऱ्या वाघाची पैसे खाणारी वाघीण अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली होती.चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकत आहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले.



ता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.

मेहबूब शेख यांनी निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेवरुन चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना म्हणाले, चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते.

I am a tiger and dont afraid of foxes and dogs, said BJP’s Chitra Wagh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात