विशेष प्रतिनिधी
भोपाळ : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला सुई-धाग्याने टाके घालण्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात घडला आहे. या भीषण प्रकाराला सामोरे गेलेल्या पत्नीने मात्र पतीवर कडक कारवाई करू नका, समज देऊन सोडून द्या अशी विनवणी केली आहे. Wife’s crazy love, even husband stitches the genitals out of suspicion of character, says don’t take action against the husband
विशेष म्हणजे पतीचे वय ६४ वर्षीय तर पत्नीचे ५५ आहे. आपल्या पत्नीचे दुसºया कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. त्यामुळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने घरातील सुई-धागा घेऊन पत्नीचे गुप्तांग शिवून टाकले. या महिलेला वेदना होऊ लागल्यावर तिने पोलीसांशी संपर्क साधला. शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथे हे टाके काढून टाकण्यात आले. मात्र, त्यामुळे पत्नीला दुखापत झाली.
पोलीसांनी हा सुई-धागा जप्त केला आहे. सिंगरौलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी सांगितले की, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. मात्र, पत्नीने पोलीसांना विनंती केली आहे की त्याच्यावर कडक कारवाई करू नका. पुन्हा असा प्रकार करू नये म्हणून केवळ समज द्या.
नुकताच उत्तर प्रदेशातही असाच प्रकार घडला होता. या घटनेत एकाने अनैतिक संबंधांच्या संशयाने पत्नीचे गुप्तांग अॅल्युमिनियमच्या धाग्याने शिवले होते. ड्रायव्हर म्हणून काम करणाºया पतीने पत्नीचे हात -पाय बांधले आणि तिच्या गुप्तांगाला टाके घातले. रक्तस्त्राव होऊ लागल्यावर पती पळून गेला. २४ वर्षीय पत्नीने आईला हे सांगितल्यावर प्रकार उघडकीस आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App