विशेष प्रतिनिधी
लंडन : युरोपातील ३० पैकी २० देश अनलॉक होत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली, स्पेन, फ्रान्समध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळ आणि आंतरराष्ट्रीय प्रवास हे नियम आणि अटींसह सुरू होत आहे.20 europian countries will unlock
तब्बल वर्षभरानंतर युरोपात अमेरिका आणि अन्य देशातील पर्यटकांसाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिका, युरोपसह जगभरात लसीकरणाला वेग आला असून संसर्गाचा वेग मंदावत चालला आहे.
लसीकरण प्रक्रिया राबविली जात असल्याने युरोपीय देशात अनेक भागात फिरण्यावरचे निर्बंध काढण्यात येत आहेत.येत्या आठवड्यात व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे पहिल्यांदा युरोपीय संघाचे दरवाजे परदेशातील नागरिकांना बंद करण्यात आले होते.
फ्रान्सने भारतासह दक्षिण आफ्रिका, ब्राझील यासह १६ देशांच्या पर्यटकांवर बंदी घातली आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना परवानगी दिली आहे. परंतु संबंधित लशीला युरोपिय युनियनची मान्यता असणे गरजेचे आहे.
फ्रान्समध्ये सीमा खुल्या झाल्या असून युरोपबाहेरील देशातील नागरिकांना कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यास प्रवेश दिला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App