कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, म्हणून पुस्तकं लिहून कन्फ्युजन तयार केले; सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर बावनकुळेंची टीका

विशेष प्रतिनिधी

नागपूर : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रावरून सध्या राजकीय वादळ उठले आहे. या पुस्तकात आणीबाणी आणि बाबरी मशीद पतन यांसारख्या मुद्द्यांवर केलेल्या उल्लेखांवरून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर आणि सोनिया गांधींवर घणाघाती टीका केली आहे. “जेव्हा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, तेव्हा पुस्तके लिहून जनतेत कन्फ्युजन तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे,” असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला.

‘भाजपवर खोटे आरोप करून बातम्यांमध्ये राहण्याची काँग्रेसची सवय’

सोनिया गांधींच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “सोनिया गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यामुळे त्या भाजपबद्दल चांगले कसे लिहितील? हे स्वाभाविक आहे की त्या धादांत खोटेच बोलतील. भाजपने हे केले, मोदीजींनी ते केले, असे खोटे आरोप करून दोन-चार दिवस मीडियामध्ये बातम्या आल्या पाहिजेत, यासाठीच ही पुस्तके लिहिली जातात. स्वतःच्या कर्तृत्वावर काही सिद्ध करता येत नाही, म्हणून पुस्तके लिहून जनतेमध्ये कन्फ्युजन निर्माण करण्याचा काँग्रेसचा जुनाच खेळ आहे.”



आणीबाणीचे खापर इंदिरा गांधींवर फोडण्यावर टीका

पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, आणीबाणीला इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांचा विरोध होता, परंतु संजय गांधी यांच्या दबावामुळे ती लादली गेली. यावर बावनकुळे म्हणाले, “देशाच्या १४० कोटी जनतेला माहिती आहे की, काँग्रेसने आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून देशासोबत सर्वात मोठे पाप केले. व्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचा आणि जगण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. तेव्हा लोकांना वाटायचे की इंग्रजांचा आणि मोगलांचा काळ यापेक्षा बरा होता! इतका वाईट निर्णय इंदिरा गांधींनी घेतला आणि आता २०२९ च्या निवडणुकांसाठी ‘तो मी नव्हेच’ असा आव आणत इंदिरा गांधीजींवर दोषारोपण करून काँग्रेस मते मिळवण्याची धडपड करत आहे.”

‘मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी बाबरीचा उल्लेख’

बाबरी मशीद पाडल्यानंतर सोनिया गांधींच्या डोळ्यात पाणी आल्याच्या पुस्तकातील उल्लेखावर बावनकुळे यांनी टीका केली. “बाबरी मशीद पाडल्यानंतर डोळ्यात पाणी आले, असे लिहिणे म्हणजे निव्वळ २०२९ मध्ये मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी केलेले लांगुलचालन आहे. पण आजची जनता हा भूतकाळ बघणार नाही. जनतेला आता फक्त एवढेच हवे आहे की, २०४७ मध्ये विकसित भारत कोण करू शकेल? आणि हे काम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसजीच करू शकतात, हे आता सर्वांना पटले आहे,” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Bawankule Targets Sonia Gandhi Over Autobiography, Says Book Creates Confusion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात