विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी एक अत्यंत खळबळजनक विधान केले असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्याबाबतीत घडलेला प्रकार हा अपघात नसून, तो घातपातच आहे, असे मला ठामपणे वाटते. मला असे का वाटते आणि कसे वाटते, यावर याआधीही बरीच चर्चा झाली आहे; परंतु हा अपघात नसून घातपातच आहे, अशी माझी प्रामाणिक मनोधारणा आहे, असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.
उमेश पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण हे केवळ माध्यमांसमोर चर्चा करण्याचा विषय नाही, तर या प्रकरणाचा सखोल तपास पूर्ण होऊन सत्य जनतेसमोर येणे अधिक महत्त्वाचे आहे. यासंदर्भात योग्य त्या कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे स्वतः गांभीर्याने पाठपुरावा करत आहेत.
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू नाही
उमेश पाटील म्हणाले की, आमच्या आमदारांच्या मनात विलीनीकरणाबाबत काय भावना आहे, याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे. जर आमदारांच्या मनात तशी भावना असती, तर आमची पावलेही त्या दिशेने पडली असती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही, नेत्यांच्या वैयक्तिक भेटींना उगाच विलीनीकरणाच्या चर्चेचा रंग दिला जात आहे. आमच्या पक्षातील कोणत्या आमदाराने तुम्हाला असे सांगितले आहे का? कोणी यावर ट्विट केले आहे का, किंवा कोणी ऑफ द रेकॉर्ड तरी असे बोलले आहे का? मग आमदार शरद पवारांना भेटणार आणि विलीनीकरणाची चर्चा करणार, हे माध्यम किंवा इतर लोक स्वतःच कसे ठरवत आहेत? नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उमेश पाटील म्हणाले की, रामदास कदमांनी पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे. कदमांकडे जर काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते सार्वजनिकपणे समोर आणावेत. कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुना राजकीय संघर्ष राहिला आहे. त्या जुन्या संघर्षातूनच ते अशी वक्तव्ये करत आहेत का, असा प्रश्न आता निर्माण होतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App