विशेष प्रतिनिधी
मुंबई / पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असताना अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांनी निवासस्थानी बैठकांचा सपाटा लावला असून दोन्ही गटांचे नेते त्यांच्या भेटीला जात आहेत. यातच अजित पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची तब्बल 2 वेळा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना जोर आला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर (X) एक अत्यंत सूचक आणि गूढ पोस्ट शेअर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
रोहित पवारांच्या सूचक पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे?; वाचा शब्दशः अर्थ!
पार्थ पवार यांच्या भेटी आणि विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी व्हॉट्सॲपवर आलेली एक अत्यंत अर्थपूर्ण व प्रेरक रचना शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘सत्य हेच तुमचं कर्म असेल, तर अपयशाची हिंमत नाही तुम्हाला रोखण्याची,’ या आशयाची व्हाटसॲपवर आलेली ही रचना अत्यंत अर्थपूर्ण, प्रेरक आणि संघर्षाला बळ देणारी आहे. नक्की ऐका…! pic.twitter.com/CGGqVIRKdN — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2026
‘सत्य हेच तुमचं कर्म असेल, तर अपयशाची हिंमत नाही तुम्हाला रोखण्याची,’ या आशयाची व्हाटसॲपवर आलेली ही रचना अत्यंत अर्थपूर्ण, प्रेरक आणि संघर्षाला बळ देणारी आहे.
नक्की ऐका…! pic.twitter.com/CGGqVIRKdN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2026
सत्य हेच तुमचे कर्म असेल तर अपयश रोखू शकत नाही
रोहित पवारांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सत्य हेच तुमचे कर्म असेल, तर अपयशाची हिंमत नाही तुम्हाला रोखण्याची, ही व्हॉट्सॲपवर आलेली रचना अत्यंत अर्थपूर्ण, प्रेरक आणि संघर्षाला बळ देणारी आहे. भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सत्य हेच तुमचे कर्म असेल तर अपयशाची हिंमत नाही तुम्हाला रोखण्याची.
संकटातच माणूस अधिक ताकदीने उजळतो
या पोस्टमधून त्यांनी संघर्षाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. “प्रत्येक संकट आज नाही तर उद्या नक्कीच संपेल. लोखंड जितके तापते, तितकी ताकद त्यामध्ये येत जाते आणि सोन्याला जितके चटके बसतात, तितके ते अधिक चमकते. हिऱ्याला जेवढी धार लावली, तितका तो अधिक उजळतो.
पर्वत सोडून पुढे जावे लागेल’ या ओळीचा रोख कोणाकडे?
पोस्टच्या शेवटी रोहित पवारांनी अत्यंत सूचक वाक्य लिहिले आहे— “सूर्यासारखे चकाकायचे असेल, तर तेवढे काम करावे लागेल आणि नदीसारखा आदर हवा असेल, तर पर्वत सोडून पुढे जावे लागेल.
पार्थ पवारांच्या 2 भेटी आणि विलीनीकरणाच्या चर्चांमागे रोहित पवारांचा इशारा नेमका कोणाला? रोहित पवार यांनी ‘संघर्षाला बळ देणारी रचना’ असे म्हणत केलेली ही पोस्ट सध्याच्या राजकीय घडामोडींशी थेट जोडली जात आहे.
पवार कुटुंबातील भेटीगाठींचा सिलसिला
ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यापासून दोन्ही गट एकत्र येणार का, यावर रोज नवनवीन दावे-प्रतिदावे केले जात आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय झाले असून पार्थ पवार यांनीही त्यांची 2 वेळा भेट घेतली आहे.
संघर्षाचा मार्ग न सोडण्याचा संदेश?
एकीकडे विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे रोहित पवार यांनी ‘सत्याचा मार्ग आणि संघर्ष’ यावर भर देणारी पोस्ट केली आहे. “नदीसारखा आदर हवा असेल, तर पर्वत सोडून पुढे जावे लागेल,” या वाक्यातून त्यांनी सत्तेचा मोह किंवा जुना आश्रय सोडून स्वतःच्या हिमतीवर संघर्ष करण्याचा संदेश तर दिला नाही ना, अशी चर्चा आता राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App