राणा सूर्यवंशीला वाचवणारी ती बडी राजकीय नावं कोणती? धंगेकरांचा फडणवीसांना थेट सवाल; गृहखात्याच्या भूमिकेवर संशय!

विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी याच्यावरील कथित हल्ला प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या प्रकरणात स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा बनाव रचून पोलीस प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप होत असताना सूर्यवंशी याच्यावर अद्याप स्वतंत्र गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही? त्याला वाचवणारी मोठी राजकीय किंवा प्रभावशाली नावं कोणती आहेत? असे थेट सवाल शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहेत.

धंगेकर यांनी ३० ऑक्टोबर रोजी समाजमाध्यमांवर पोस्ट करत राणा सूर्यवंशी प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर आणि गृहखात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्वतःवर खोटा गोळीबार आणि हल्ल्याचा कट रचून पोलीस प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सूर्यवंशीवर अद्याप अधिकृत गुन्हा का दाखल झालेला नाही. या प्रकरणात सूर्यवंशी याचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध नेमके कोणाशी आहेत.



त्याला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे? त्याचे प्रभावशाली राजकीय व्यक्तींशी थेट संबंध आहेत का? गृहखात्याला तो एवढा डोईजड का झाला आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच सूर्यवंशी पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारे गोंधळात टाकत असतानाही गृहखाते मूकप्रेक्षकाची भूमिका का घेत आहे. पुणे पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे आणि पोलिसांचा आवाज कोण दाबत आहे, याचा खुलासा होण्याची गरज असल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे.

फडणवीसांनी जनतेसमोर खुलासा करावा…

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडावी. राणा सूर्यवंशी प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी करून त्यामागील आर्थिक आणि राजकीय हितसंबंध समोर आणावेत. तसेच पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव असेल तर त्याचाही खुलासा करावा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

Dangekar poses a direct question to Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात