मतदारांना मोठा दिलासा! प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील नावे आणि तपशील तपासून आवश्यक दावे किंवा हरकती दाखल करण्याची संधी मतदारांना देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी आता २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या किंवा नोंदीमध्ये त्रुटी आढळलेल्या पात्र नागरिकांना आवश्यक अर्ज दाखल करता येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा आहे. दाखल झालेल्या दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.



पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि वैयक्तिक तपशील तपासून घ्यावेत. यादीत नाव नसल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी, नोंदीमध्ये चूक असल्यास दुरुस्तीसाठी किंवा आवश्यक असल्यास हरकत नोंदवण्यासाठी २६ ऑक्टोबरपूर्वी संबंधित अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवणे तसेच प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, हा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे मतदारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपली नोंद तपासावी आणि आवश्यक प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करावी. असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026 असून

दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026 चालणार आहे. अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 राेजी प्रसिध्द हाेणार आहे.

Major relief for voters! Deadline extended for objections to the draft electoral roll; Chief Minister makes the announcement.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात