पुरुषोत्तम जगतापांसह पॅनलमधील सदस्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

विशेष प्रतिनिधी

बारामती :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे केल्याने बंडखोर विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारवाई केली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

कारखान्याच्या निवडणुकीत जगताप यांनी अजित पवार गटापासून फारकत घेत स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली असून, पक्षाच्या अधिकृत पॅनलसमोर आव्हान उभे राहिले आहे. जगताप यांच्या भूमिकेमुळे पक्षाने अखेर कारवाईचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत यापूर्वीच तीन पॅनल आमनेसामने आले आहेत. त्यात जगताप यांनी स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने लढतीतील चुरस वाढली आहे. पक्षाने केलेल्या कारवाईमुळे या संघर्षाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. या कारवाईचा निवडणुकीतील मतांच्या गणितावर काय परिणाम होतो, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Panel members, including Purushottam Jagtap, expelled from the NCP.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात