२६/११च्या न्यायलढ्याची कहाणी पडद्यावर; ‘प्रहार’च्या ट्रेलरचा फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात न्यायालयात लढली गेलेली प्रदीर्घ कायदेशीर लढाई आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला.

या कार्यक्रमाला खासदार ॲड. उज्ज्वल निकम, अभिनेता राजकुमार राव, मॅडडॉक फिल्म्सचे निर्माते-दिग्दर्शक, पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी तसेच २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २६/११च्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात न्यायालयात अनेक वर्षे लढली गेलेली लढाई या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहे. हा केवळ मनोरंजनासाठीचा चित्रपट नसून एक महत्त्वाचा संदेश देणारा चित्रपट आहे.

भारतीय पोलीस आणि न्यायव्यवस्थेने अत्यंत विचारपूर्वक संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की, भारतात कायद्याच्या माध्यमातून न्याय दिला जातो. विशेषतः ॲड. उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेमुळे २६/११ हल्ल्यातील शहीदांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची कायदेशीर लढाई लढली गेली, असे फडणवीस यांनी नमूद केले.



२६/११च्या वीरांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. मुंबईच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांचा मुकाबला करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

फडणवीस यांनी सांगितले की, २६/११च्या रात्री शौर्याने लढलेल्या आणि दहशतवाद्यांना काबूत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या वीरांचा सन्मान करणे आवश्यक आहे. या खऱ्या नायकांसाठी अंतिम न्याय म्हणजे या घटनेमागील दहशतवादी कारवायांची वस्तुस्थिती संपूर्ण जगाला समजणे, असेही त्यांनी म्हटले.

राजकुमार राव साकारणार उज्ज्वल निकमांची भूमिका

‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासासोबतच २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित न्यायालयीन लढाईवर आधारित आहे. अभिनेता राजकुमार राव यांनी चित्रपटात ॲड. उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

The story of the 26/11 legal battle comes to the screen; ‘Prahar’ trailer launched by Fadnavis.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात