विशेष प्रतिनिधी
पुणे : केतन अगरवाल हत्याप्रकरणात 5,300 पानांचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. 18 जून रोजी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांनी काढलेल्या फोटो आणि व्हिडिओच्या तपासणीनंतर एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे.Ketan Agarwal Case
मिळालेल्या माहितीनुसार, केतन अगरवाल, सिया गोयल आणि चेतन चौधरी हे तिघेही घटनाकाळात लोहगडावर उपस्थित असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तपासादरम्यान 18 जून रोजी लोहगडावर उपस्थित असलेल्या पर्यटकांचा शोध घेतला. त्यांच्या मोबाईल आणि कॅमेऱ्यातील छायाचित्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी आरोपींच्या नकळत काढल्या गेलेल्या काही फोटोंमधून तिघांची घटनास्थळी उपस्थिती स्पष्ट झाल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.
सियाने लाथ मारल्यानंतर केतनला दरीत ढकलल्याचा दावा
दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानेही या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. घटनेच्या वेळी काही अंतरावर असलेल्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयलने चेतन चौधरीला काही इशारे दिले. त्यानंतर तिने केतनला लाथ मारला आणि लगेचच चेतनने त्याला दरीत ढकल्याचे साक्षीदाराने पोलिसांना सांगितल्याचे, चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
चार्जशीटनुसार, साक्षीदारालाही ‘तुलाही दरीत फेकून देऊ’ अशी धमकी देण्यात आल्याचे जबाबात म्हटले आहे. सुरुवातीला भीतीपोटी या व्यक्तीने माहिती दिली नाही. मात्र, हत्याकांडाची माहिती माध्यमांमधून समोर आल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार कथन केल्याचे चार्जशीटमधील तपासातून समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App