सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल; कारण काय?

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे, शिवसेना ठातरे गटाच्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांच्या नावाचा समावेश आहे. Sushma Andhare

रूपाली चाकणकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, नाशिकच्या ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची 9 वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्या तेथे जात होत्या. 18 मार्च 2026 रोजी खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे टीव्ही व प्रसार माध्यमांमधून समजल्यानंतर, त्यांच्यासोबतच्या सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो-व्हिडिओ वापरून आपल्यावर असंबद्ध आरोप सुरू झाल्याचा दावा चाकणकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.



तसेच, 20 मार्च 2026 रोजी सोशल मीडिया तपासताना त्यांना सुमारे 19 फेसबुक / इंस्टा / युट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचे आढळले. या प्रकरणी त्यांनी – संगिता तिवारी, अॅड. अशोक बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री सर्मींदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिधान्त, रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, योगेश सावंत, दिपाली सय्यद, डॉ. आशा मिरगे आणि मोहसीन शेख यांची नावे तक्रारीत नमूद केली आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टवर मिलिंद मारुती गोरे, सपना नंदकिशोर राऊत आणि इतर अनेकांनी लैंगिक, अश्लील आणि अपमानास्पद कमेंट करून विनयभंग व मानहानी केल्याचा आरोपही फिर्यादीत आहे. पुरावा म्हणून त्यांनी स्क्रीनशॉट आणि पोस्टचे पुरावे पोलिसांना सादर केले असून, मानसिक त्रास आणि सामाजिक मानहानी झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या पोस्ट आणि कमेंट्समुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसला, मानसिक त्रास झाला आणि सामाजिक मानहानी सहन करावी लागली, असे चाकणकर यांनी पोलिसांना सांगितले आहे.

चाकणकर यांनी संबंधित स्क्रीनशॉट, सोशल मीडिया पोस्ट, कमेंट्सचे पुरावे आणि इतर कागदपत्रे तपासासाठी पोलिसांकडे सादर केली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नाली चंद्रकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Rupali Thombare, Sushma Andhare Among 19 Booked Over Alleged Defamation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात