परीक्षा अर्जासाठी मोठी अपडेट! २.४० लाख विद्यार्थ्यांसाठी आली दिलासादायक बातमी; काय आहे ‘झिरो चलन’ सुविधा?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत राज्यातील २६ विद्यापीठांमधील तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी एकही रुपया परीक्षा शुल्क न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ झाली असून, या भागांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ देण्यात येत आहे.

परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी विद्यापीठांच्या अर्ज प्रक्रियेत ‘झिरो चलन’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेमुळे पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही परीक्षा शुल्क न भरता अर्ज दाखल करता येत आहेत. यासंदर्भात सर्व विद्यापीठांनी आवश्यक परिपत्रके जारी केली आहेत.
आधी भरलेले परीक्षा शुल्कही परत मिळणार



ज्या पात्र विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना भरलेली रक्कम परत करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर समन्वय यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत असून, या सवलतीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाखांवर जाण्याचा अंदाज उच्च शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

पात्र विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व विद्यापीठांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शुल्कमाफीसंदर्भात अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, जनसंपर्क अधिकारी किंवा विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.

Zero challan’ facility for exam forms brings relief to 2.40 lakh students

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात