2 कोटींची डिफेंडर मनोज जरांगेंच्या ताफ्यात कशी आली? मालकाने सांगितलं खरं कारण; म्हणाले, ‘देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती…’

विशेष प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्र : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्या आलिशान डिफेंडर कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये किंमत असलेली पांढऱ्या रंगाची नवीकोरी डिफेंडर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, ही गाडी जरांगेंची स्वतःची नसून एका मराठा समाजातील व्यक्तीने त्यांना वापरण्यासाठी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत केले जात आहे. कुठे जेसीबीमधून पुष्पवृष्टी केली जात आहे, तर कुठे मोठ्या संख्येने समर्थक गर्दी करत आहेत. याच दौऱ्यात जरांगे ज्या डिफेंडरमधून प्रवास करत आहेत, त्याचीही चर्चा सुरू झाली.

यानंतर जरांगे पाटील यांनी ही गाडी आपली नसल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजातील एका व्यक्तीने ही कार त्यांना वापरण्यासाठी दिली आहे. या गाडीचे मालक सुभाष भोसले यांनीही याबाबत माहिती दिली.

‘मनोज जरांगे माझ्या गाडीत बसावेत, ही इच्छा होती’

सुभाष भोसले यांनी सांगितले की, नवीन गाडी घेतल्यानंतर आपण देवाच्या दर्शनासाठी जातो. मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी देवापेक्षाही मोठं काम करणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या गाडीत बसावं, अशी मनापासून इच्छा होती.



मराठा समाजासाठी आंदोलन आणि उपोषण करताना जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यातच ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचे समजल्यानंतर भोसले यांनी डिफेंडर खरेदी केली. पंढरपूरमधील सरकोली येथील सभेनंतर त्यांनी ही गाडी जरांगे यांना वापरण्यासाठी दिली.

गाडीतील सुविधांमुळे जरांगे पाटील यांचा प्रवासातील त्रास कमी व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे भोसले यांनी सांगितले.

गाडीसाठी घेतलं दीड कोटींचं कर्ज

या डिफेंडरची किंमत सुमारे 1 कोटी 90 लाख रुपये असल्याचे सुभाष भोसले यांनी सांगितले. ही गाडी खरेदी करण्यासाठी त्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

दौऱ्यात अनेक लोक गाडीवर चढतील-उतरतील आणि त्यामुळे गाडी खराब होऊ शकते, याची जाणीव असूनही त्याची आपल्याला चिंता नसल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.

‘मला व्यवसायामुळे समाजासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तीला फुल नाही, तर फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,’ या भावनेतून आपण ही गाडी वापरण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले.

सुभाष भोसले हे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील रहिवासी असून त्यांचा सराफा व्यवसाय आणि शेती आहे. त्यांच्याकडे सुमारे 10 एकर ऊसाची शेती असल्याची माहिती आहे.

Manoj Jarange Patil Defender Car

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात