TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांच्या बिहारमध्ये मुसक्या आवळल्या:8 हजारांचा पेपर फोडून दीड कोटीला विकण्याचा कट उधळला

TET Paper Leak

विशेष प्रतिनिधी

मुंबई : TET Paper Leak महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला त्याच्या एका साथीदारासह बिहारमधील पाटणा येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भिवंडी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही फिल्मी स्टाइल धाडसी कारवाई केली.TET Paper Leak

या २ नव्या अटकेमुळे या गुन्ह्यात गजाआड झालेल्यांची एकूण संख्या आता १४ झाली आहे. भिवंडी परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी विजयेंद्रकुमार ऊर्फ बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याचा साथीदार इंद्रजित सिंह यांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे.TET Paper Leak



त्यांना शनिवारी पुण्यात आणि त्यानंतर पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणण्यात आले. २८ जून रोजी राज्यभरातील १ हजार २८ केंद्रांवर टीईटीची परीक्षा होणार होती. मात्र, तत्पूर्वीच २७ जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी डमी ग्राहक बनून छापा टाकला. त्यात जप्त केलेल्या प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्याने परीक्षा पुढे ढकलत एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.

नॉलेज : अटकेतील आरोपींची संख्या १४ वर, १२ कोठडीत : २७ जून २०२६ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. दोघांच्या अटकेमुळे आतापर्यंत अटक केलेल्या १४ आरोपींमध्ये बिहार, उत्तर प्रदेश व अन्य राज्यांतील सदस्यांचा समावेश आहे. १२ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. यात आग्रा येथील छापखान्यातील ३ कर्मचारी (नरेशकुमार, संजयकुमार, बाबूलाल) आणि मुख्य आरोपीची पत्नी सुमन कुमारी हिचाही समावेश आहे.

छापखान्यातून बुटात लपवून पेपर बाहेर

मुख्य आरोपीने आग्रा येथील एका खासगी छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैसे व मालमत्तेचे आमिष दाखवले. छापखान्यातील या कर्मचाऱ्यांनी अत्यंत गोपनीय असलेला हा पेपर चक्क बुटात लपवून बाहेर काढला होता.

TET Paper Leak Mastermind and Accomplice Arrested in Bihar by Bhiwandi Police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात