वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नीट परीक्षा फुटीच्या पार्श्वभूमीवर कॉकरोज जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनात नेमके कोण सामील झाले आणि त्यातले सोशल मीडिया हॅण्डलिंग कुणी आणि कसे केले??, याची धक्कादायक आकडेवारी दिल्ली पोलिसांनी आज जाहीर केली. दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात घुसलेल्या समाजकंटकांची विविध अंगांनी तपासणी केली. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी बाहेर आली.
– 400 पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्स
दिल्लीचे डीसीपी (मध्य) रोहित राजबीर सिंह यांनी सांगितले की, “दिल्ली पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की, पाकिस्तानमधून चालवली जाणारी काही सोशल मीडिया खाती चुकीची माहिती (फेक कंटेंट) पसरवत आहेत. दिल्ली पोलीस संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने अशा आणखी खात्यांची ओळख पटवण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. आंदोलनाशी संबंधित एआय-जनरेटेड (AI-generated) मजकूर, डीपफेक व्हिडिओ, संपादित फोटो आणि इतर चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी आतापर्यंत ४०० हून अधिक अशा हँडल्सची (खात्यांची) ओळख पटवून ती बंद करण्यात आली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही चुकीची माहिती पसरवण्यात अशी काही खाती सक्रिय असल्याचे आढळून आले होते. या सोशल मीडिया खात्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत निवेदने संपादित करून आणि दृश्य मजकुरात फेरफार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.”
डीसीपी सेंट्रल’ रोहित राजबीर सिंह म्हणाले, “सोशल मीडियावर माहिती खूप वेगाने पसरते, परंतु प्रत्येक पोस्ट, व्हिडिओ किंवा फोटो अचूक असेलच असे नाही. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा ती पुढे शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिल्ली पोलीसही सोशल मीडियावर सतत लक्ष ठेवून आहेत. आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडल्सद्वारे फेक न्यूज (खोट्या बातम्या), एआय (AI) आणि डीपफेक व्हिडिओ, एडिट केलेले क्लिप्स आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सबाबत सतत माहिती देत असतो, जेणेकरून लोकांना खरी आणि खोटी माहिती यांमधील फरक ओळखता येईल.”
– आंदोलनात घुसले 2000 समाजकंटक
याआधी दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी आंदोलनातली आणखी काही आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये सध्या जंतर – मंतरवर 10000 च्या आसपास लोक असून त्यामध्ये 2000 समाजकंटक सुद्धा येऊन गेले, असे पोलिसांना फेशियल रेकग्निशन सिस्टीमच्या आधारे आढळून आले. या 2000 समाजकंटकांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती दिल्ली पोलिसांकडे असून त्या आधारेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी सुरू केली.
#WATCH | Delhi: DCP Central Rohit Rajbir Singh says, "Our investigation also revealed that some social media accounts operated from Pakistan are spreading fake content. Delhi Police, in collaboration with the concerned agencies, is continuously working to identify more such… https://t.co/Z1XAl9jTic pic.twitter.com/WyjvVx5MTf — ANI (@ANI) July 25, 2026
#WATCH | Delhi: DCP Central Rohit Rajbir Singh says, "Our investigation also revealed that some social media accounts operated from Pakistan are spreading fake content. Delhi Police, in collaboration with the concerned agencies, is continuously working to identify more such… https://t.co/Z1XAl9jTic pic.twitter.com/WyjvVx5MTf
— ANI (@ANI) July 25, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App