धर्मेंद्र प्रधानांची खुर्ची खुंटा हलवून बळकट; पण त्याच वेळी पेपर फुटीचे गुन्हेगार अडकणार फास्ट ट्रॅक कोर्टात!!

Dharmendra Pradhan

नाशिक : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात काँग्रेस सह बाकीचे विरोधी पक्ष घुसल्याने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची खुंटा हलवून बळकट झाली, पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा करून राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि विरोधकांवर मात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया पोस्ट लिहून पेपर फुटीच्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात खेचून त्यांना कठोर शिक्षा करायची सरकारची भूमिका जाहीर केली. त्यामुळे एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची खुंटा हलवून बळकट झाली, पण त्याच वेळी विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले. Dharmendra Pradhan

– दोन अंदाज चुकले

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन चिघळले. त्यामध्ये जंतर – मंतरवरची गर्दी आणि तिचे आकलन करण्यात दिल्ली पोलीस कमी पडले. त्याचबरोबर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते राजाजी मार्गावरून थेट ७, लोक कल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर येतील, याचाही अंदाज घेण्यात यंत्रणांची चूक झाली. या दोन्ही चुका केंद्र सरकारने एक प्रकारे मान्य केल्या. किंबहुना त्यांना त्या मान्य कराव्या लागल्या. त्यामुळेच भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन counter narrative तयार करण्याचा निर्णय झाला. किंबहुना तो घ्यावा लागला. केंद्रातले मोदी सरकार विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी अग्रक्रम देते, पण त्याचवेळी आंदोलनामध्ये शिरलेल्या देशद्रोह्यांचा मुकाबला करण्यात सरकार मागे हटणार नाही, असा दुहेरी संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीतून दिला. या संदर्भात दैनिक भास्करने सविस्तर बातमी दिली.



– मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित होता, पण…

वास्तविक या प्रकरणाला आणखी एक वेगळाच कोन मिळत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे फेरबदल करण्याची बातमी सगळीकडे फिरत होती. त्याला विशिष्ट सूत्रांचा आधार देखील मिळाला होता. मंत्रिमंडळाच्या फेरबदलात धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांची गच्छंती करून त्यांना वेगळे काम देण्याचा निर्णय सुद्धा घाटत होता. मंत्रिमंडळात आणि पक्षात तरुणांना संधी हा निकष लावला होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी काही दिवस हा मंत्रिमंडळातला फेरबदल अपेक्षित होता.

– या कारणामुळे बदलला मोदींचा इरादा

पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परत आले. त्याचवेळी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने चिघळण्याच्या दृष्टीने वेग घेतला होता. त्यामध्ये खलिस्तानवाद्यांसारखी वेगवेगळी देशद्रोही elements शिरल्याचे उघडपणे दिसायला लागले होते. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळातला फेरबदल दिसला नाही आणि त्या पाठोपाठ काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांनी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झपाट्याने ताब्यात घेतले. राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी हे सगळे नेते कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात शिरले आणि तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इरादा बदलला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन विरोधकांचे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही, असा निर्धार सरकारने केला. किंबहुना विरोधकांच्या आक्रमक खेळीमुळे सरकारलाही प्रतिआक्रमक डाव खेळावा लागला. अन्यथा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सहज घडला असता. राहुल गांधींनी आणि बाकीच्या विरोधकांनी आंदोलनामध्ये शिरकाव करून धर्मेंद्र प्रधानांची खुर्ची परस्पर खुंटा हलवून बळकट केली. त्याचवेळी मोदी सरकारला विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने फास्ट ट्रॅक कोर्टासारखे निर्णय घ्यायला लावणे सुद्धा भाग पाडले.

Dharmendra Pradhan has firmly consolidated his position

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात