FDA Raids : सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDAची कारवाई; 8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी

FDA Raids

विशेष प्रतिनिधी

मुंबई : FDA Raids पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना व्यवसाय आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 8 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, हे दुकान तात्काळ बंद करण्याचे कडक आदेश प्रशासनाने दिले आहेत.FDA Raids

4 हजारांहून अधिक किलोचा संशयास्पद माल जप्त

एफडीएच्या पथकाने मार्केटयार्डमधील प्रवीण गोयल यांच्या ‘मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी’ या पेढीवर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान तब्बल ४,१७२ किलोचा संशयास्पद आणि आरोग्यास हानिकारक असणारा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. याची बाजारातील किंमत सुमारे ८ लाख १४ हजार ६३० रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या साठ्यामध्ये ५९८ किलो ‘संत’ ब्रँडची हळद पावडर, १,२५८ किलो ‘साधू’ ब्रँड हळद पावडर, ५३८ किलो ‘ग्रीन लीफ’ तीळ आणि १,७७८ किलो ‘मधुर’ सोया मिनी चंक्स यांचा समावेश आहे. पुढील विश्लेषणासाठी या सर्व अन्नपदार्थांचे नमुने एफडीएने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.FDA Raids



 

विनापरवाना व्यवसाय अन् नियमांचे गंभीर उल्लंघन

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, प्रवीण गोयल यांची ही पेढी कोणताही वैध अन्न परवाना किंवा अधिकृत नोंदणी नसताना पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालवली जात होती. तसेच, दुकानातून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावर अन्नपदार्थांच्या लेबलिंगच्या नियमांचेही अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. हा सर्व जप्त केलेला साठा अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असण्याची दाट शक्यता एफडीएने वर्तवली आहे.

खुनाच्या घटनेनंतर कुटुंबाला दुसरा मोठा धक्का

काही दिवसांपूर्वीच, म्हणजेच १८ जून २०२६ रोजी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या कारागृहात आहेत. या खुनाच्या घटनेची चर्चा आणि संताप ताजा असतानाच, आता सियाच्या वडिलांच्या बेकायदेशीर व्यवसायावर एफडीएने हा कायदेशीर हातोडा चालवल्याने व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही धडक कारवाई एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) डी. डब्ल्यू. भोगवडे आणि सहायक आयुक्त निलेश खोसे यांच्या नेतृत्वात, अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. सोनकांबळे आणि प्रतीक जाधव यांच्या पथकाने केली.

FDA Raids Shop of Siya Goyal’s Father in Pune; ₹8 Lakh Suspected Stock Seized

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात