सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आव्हान मिळताच राष्ट्रवादी झटकन explanation mode मध्ये!!; सच्चिदानंद सिंह यांच्या मागे कुणाची चालली बुद्धी??

नाशिक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला झारखंड सारख्या दुरुस्त राज्यातून आव्हान मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस झटकन explanation mode मध्ये आली, किंबहुना पक्षाला तशा mode मोडमध्ये यावे लागले. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवड पक्षाच्या घटनेला धरून नाही. त्यामुळे ती निवड रद्द करावी, असे पत्र झारखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी पक्षालाच पाठविले. त्यामुळे पक्ष कायदेशीर दृष्ट्या अडचणीत आला. कारण पक्षाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने एखाद्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षाने थेट राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला explanation mode मध्ये यावे लागले.

– explanation mode

सच्चिदानंद सिंह यांनी पाठविलेल्या पत्राबाबत सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांना खुलासा करावा लागला. त्यांच्या पत्रामागे आपण नाही. आपण त्यांना कुठलीही सूचना केली नाही, असे प्रफुल्ल पटेल यांना वारंवार सांगावे लागले. त्यांच्या पाठोपाठ सुनील तटकरे यांना explanation mode मध्ये यावे लागले. त्यातही त्यांना केवळ राजकीय उत्तर न देता कायदेशीर आधार घ्यावा लागला. “मी ते पत्र पाहिले. कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही संबंधितांना नोटीस पाठवू”, असे सुनील तटकरे म्हणाले.

– सुनील तटकरेंकडून सुनेत्रा पवारांचे समर्थन

पण त्यापलीकडे जाऊन सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेचे समर्थन केले. अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष निवडावा लागला. त्यामध्ये पक्षाने पक्षाची घटना आणि निवडणूक आयोगाने सांगितलेल्या क्रमपद्धतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड केली. त्यामध्ये कुठलीही कायदेशीर त्रुटी ठेवली नाही. सुनेत्रा पवारांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी सुद्धा नेमली. त्यामध्ये सुद्धा कायदेशीर त्रुटी ठेवली नाही. त्यामुळे संबंधित नेत्याने पाठविलेल्या पत्राला तसा कायदेशीर आधार नाही, असा दावा सुनील तटकरे यांनी केला, पण त्याचवेळी अजून सुद्धा म्हणजे पत्र पाठविल्यानंतर पाच दिवसांनी सुद्धा पक्षाने सच्चिदानंद यांना नोटीस पाठविली नाही. त्यामुळे पक्षाला कायदेशीर आधार घ्यायची गरज भासली.

– सच्चिदानंद सिंह यांच्या मागे कुणाची चालली बुद्धी??

एकीकडे महाराष्ट्रातच सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पहिल्या आणि दुसऱ्या फळीत असलेल्या नेत्यांचा सुप्त संघर्ष सुरू असताना अचानक महाराष्ट्र बाहेरच्या, ते सुद्धा झारखंड सारख्या दूरच्या राज्यातून अचानक आव्हान निर्माण झाल्याने या सर्व प्रकरणाला वेगळाच राजकीय वास आला. अचानक सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नेमकी कुठली त्रुटी आढळली?? त्यात कुठल्या कायदेशीर पेच आढळला??, याविषयी त्यांनी खुलासा केला नाही. त्याचबरोबर पक्षाच्या वर्तुळातून सुद्धा अजून तरी कोणी खुलासा केला नाही. त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांच्या पत्रामागे नेमकी कुणाची बुद्धी चालली आणि तिचा वापर नेमका कुणी केला??, याविषयी राष्ट्रवादीच्या वर्तुळात दाट संशय निर्माण झाला आहे.

– पवारांच्या कौटुंबिक संघर्षाचा कोन

त्याचबरोबर राष्ट्रवादीला बरोबर घेणाऱ्या भाजपच्या वर्तुळात सुद्धा वेगळाच संशय निर्माण झाला आहे. एकीकडे सुनेत्रा पवार स्वतःचे आणि पार्थ पवारांचे नेतृत्व राष्ट्रवादीत प्रस्थापित करून पाहत असताना दुसरीकडे अचानक त्यांच्याच नेतृत्वावर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे आणि त्या पलीकडे जाऊन कायदेशीर पेच निर्माण व्हावा, यामध्ये पवारांच्या घरातल्या संघर्षाचा एक वेगळाच राजकीय कोन नाही ना??, याविषयी सुद्धा अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. पण या संशयावर अजून तरी कोणी स्पष्टीकरण द्यायला पुढे आलेले नाही.

The NCP immediately went into ‘explanation mode’ as soon as Sunetra Pawar’s leadership faced a challenge.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात