नाशिक : एकीकडे पंजाबात काँग्रेसमध्ये दलित नेत्याचे बंड; तर दुसरीकडे काँग्रेसचे मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष त्यामुळे बडे नेते तीव्र नाराज झाल्याची बातमी समोर आली. काँग्रेसने मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याने मुस्लिमांमध्ये बडे नेते तीव्र नाराज झालेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.Dalit leader has rebelled within the Congress in Punjab
– रशीद अल्वी नाराज
काँग्रेसने अल्पसंख्यांक सेलची बैठक बोलावली होती, पण त्या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते रशीद अल्वी यांना निमंत्रणच दिले नव्हते. काही निवडक नेत्यांची बैठक घेऊन काँग्रेसने अल्पसंख्यांकांची बोळवण केली. त्यावरून रशीद अल्वी यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. वास्तविक अल्पसंख्यांक समाजाची काँग्रेसची “वोट बँक” आहे. काँग्रेसने मुस्लिम नेत्यांकडेच दुर्लक्ष केले, तर असदुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या नेत्यांचे महत्त्व वाढते. काँग्रेसमध्ये निवडक नेत्यांनाच महत्त्व दिले जाते. पक्षात संवादाचा सुद्धा अभाव निर्माण झालाय. काँग्रेसच्या हायकमांड पर्यंत पोहोचणे अवघड झालेय, असे टीकास्त्र रशीद अल्वी यांनी सोडले.
– हुसेन दलवाई नाराज
रशीद अल्वी यांचे वक्तव्य काँग्रेस मधल्या अन्य मुस्लिम नेत्यांनी सुद्धा उचलून धरले. राहुल गांधी एकीकडे दिवस-रात्र मेहनत घेत असताना बाकीच्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका महाराष्ट्रातले काँग्रेसचे वरिष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केली. रशीद अल्वी यांनी मांडलेला मुद्दा योग्यच आहे. पण काँग्रेस फक्त केंद्रीय पातळीवरच्याच मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष करत नाही तर प्रदेश पातळीवरच्या मुस्लिम नेत्यांकडे सुद्धा दुर्लक्ष करतेय, असे शरसंधान हुसेन दलवाई यांनी साधले.
– चरणजीत सिंग चन्नींचे बंड
एकीकडे पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी थेट काँग्रेस हायकमांड विरुद्ध आवाज उठवला असताना दुसरीकडे रशीद अल्वी आणि हुसेन दलवाई यांच्यासारख्या मुस्लिम नेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्यात. चरणीजीत सिंग चन्नी पंजाब मधले दलित नेते असून काँग्रेसने त्यांना त्याच मुद्द्यावर मुख्यमंत्रीपदावर बसविले होते. पण नंतर मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच ते चिडून काँग्रेस हायकमांड विरोधात बोलले. त्यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यापाठोपाठ रशीद अल्वी आणि हुसेन दलवाई यांनी सुद्धा काँग्रेस हायकमांडच्या विरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त करून पक्षाला सार्वजनिक पातळीवर अडचणीत आणून ठेवले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: On Congress leader Rashid Alvi's statement that he is not invited to party's minority committee meeting, party leader Husain Dalwai says, "…This is happening everywhere, even in Maharashtra. High command should see that senior leaders are not… pic.twitter.com/ePhm9KPnYo — ANI (@ANI) July 4, 2026
#WATCH | Mumbai, Maharashtra: On Congress leader Rashid Alvi's statement that he is not invited to party's minority committee meeting, party leader Husain Dalwai says, "…This is happening everywhere, even in Maharashtra. High command should see that senior leaders are not… pic.twitter.com/ePhm9KPnYo
— ANI (@ANI) July 4, 2026
– विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग
त्यामुळे एकीकडे काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते “इंडी” आघाडीतल्या पक्षांची एकजूट करायच्या मागे लागले असताना आणि काही नेते ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन करत असताना खुद्द काँग्रेस पक्षातच दलित आणि मुस्लिम समुदायांचे नेते नाराज झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App