Maharashtra TET : TET चा पेपर फुटला, उद्या होणारी परीक्षा रद्द; भिवंडीत प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण ताब्यात; मुख्यमंत्र्यांचे SIT गठित करण्याचे आदेश

Maharashtra TET

वृत्तसंस्था

मुंबई : Maharashtra TET राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. लवकरच फेरपरीक्षेबाबत अधिकृत सूचना निघणार आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाली असून याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Maharashtra TET

दरम्यान, या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून, या संपूर्ण रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी तात्काळ विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन करून तपासाबाबत सक्त निर्देश दिले आहेत.Maharashtra TET



“या पेपरफुटीच्या गुन्ह्यात जे कोणी सामील असतील, मग ते कितीही मोठे असोत, त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करा. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाऊ नये,” असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या प्रवृत्तींचा तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी एसआयटीला विशेष अधिकार देण्यात आल्याचे समजते.

शिक्षणमंत्री यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची चर्चा

पोलिस महासंचालकांना सूचना दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनाही फोन करून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. परीक्षा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेला असंतोष, विद्यार्थ्यांचे नुकसान आणि शिक्षण विभागापुढील आव्हाने यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

आरोपी दिल्लीहून आले, 1.5 कोटींची होती मागणी, आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक

राज्यात 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेचा पेपरफुटीचा मोठा कट भिवंडी पोलिसांनी उधळून लावत तीन आरोपींना अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे कोनगाव पोलिसांनी सापळा रचून आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त केले. शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतर हेच मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपींनी हा पेपर विकण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची मागणी केली होती. हे पेपर पुढे विविध उमेदवारांना विकण्याचा त्यांचा कट होता.

अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणाचा, तर दोघे बिहारचे असून ते दिल्लीहून प्रश्नपत्रिका घेऊन भिवंडीत आले होते. आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट-क्रेडिट कार्डसह अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून त्याचे नेतृत्व डीसीपी पवन बनसोड करणार आहेत. पेपर दिल्लीतून कसा बाहेर आला, शिक्षण विभागातील कोणाचा सहभाग आहे का आणि या रॅकेटचे आणखी धागेदोरे कोणते, याचा तपास सुरू आहे. विविध राज्यांमध्येही पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

फेरपरीक्षेसाठी 6 लाखांहून अधिक उमेदवारांना दिलासा

परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात उमेदवारांची कोणतीही चूक नाही. त्यामुळे ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवी तारीख दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. त्यांनी सांगितले की, ही परीक्षा पुन्हा घेण्यासाठी नियोजनाची सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

1028 केंद्रांवर पुन्हा होणार परीक्षा

राज्यातील 37 शहरांतील 1028 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी सुमारे 6 लाख 1 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे लाखो उमेदवारांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे.

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर काय म्हणाले?

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, टीईटी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या मते, नीट पेपरफुटीनंतर परीक्षा परिषदेने सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या. मात्र, भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिका असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून प्रश्नपत्रिका खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा रद्द करण्यात आली.

Maharashtra TET Cancelled Over Paper Leak; CM Orders SIT Probe

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात