भाजप महायुतीच्या राजवटीला काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीची “अवकळा”; आमदार – खासदारांच्या तोंडी शिव्या आणि जातिवादाची भाषा!!

नाशिक : भाजप महायुतीच्या राजवटीला काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीची “अवकळा”; आमदार – खासदारांच्या तोंडी शिव्या आणि जातिवादाची भाषा!!, हे गंभीर राजकीय वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले.

राम मंदिरातील चोरी

एकतर काँग्रेसी राजवटीच्या काळात ज्याप्रमाणे घोटाळे होत होते, त्याच पद्धतीचा घोटाळ्याचा मामला अयोध्येच्या राम मंदिरातून पुढे आला. तिथल्या देणगी मध्ये चंपत राय आणि अनिल मिश्रा या दोघांच्या निकटवर्तीयांनी हात मारला. हा सगळा प्रकार चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या नाकाखाली होत होता, तरीसुद्धा संघ परिवाराने चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना वेळीच ठोकून बाजूला काढले नाही. अलोक कुमार यांच्यासारखे विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख सुद्धा अजून माझ्याकडे चंपत राय यांच्या राजीनाम्याची अधिकृत बातमी आली नाही, असेच म्हणत राहिले. विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवाराने चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या बचावाचा भरपूर प्रयत्न केल्याचे वास्तवच यातून समोर आले. पण राम मंदिरातल्या चोरीचा मुद्दा केवळ विरोधकांच्या राजकीय पोळी भाजायचा राहिला नाही तो त्यापलीकडे जाऊन हिंदू समाजाच्या विश्वासाला आणि भक्तीला तडा देणारा ठरला म्हणून तर राम मंदिरातल्या देणगीची रक्कम घटली. ज्या विश्वासाने आणि भक्तीने संपूर्ण हिंदू समाजाने राम मंदिराच्या उभारणीसाठी योगदान दिले त्या विश्वासाला संघ परिवारातल्या काही मूठभर लोकांमुळे तडा गेला. पण त्यातून धडा घेऊन संघ परिवाराने चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना वेळीच बाजूला केलेले दिसले नाही.

विश्वासार्हतेला धक्का

राम मंदिरातल्या चोरी प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाने काही माहिती मागविली पण ती सुद्धा चंपत राय यांनी दिली नाही. अखेरीस आठ लोकांना अटक झाल्यानंतर चंपत राय यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. पण तोपर्यंत संघ परिवाराच्या विश्वासार्हतेला धक्का लागायचा, तो लागलाच!!

संजय दिना पाटलांची अरेरावी

त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये जुन्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सत्तेचा माज शिरल्याचे लक्षण दिसून आले. म्हणून तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताच संजय दिना पाटलांनी पत्रकारांना शिव्या देऊन वर दमबाजी केली. संजय दिना पाटील हे मूळचे काँग्रेसी संस्कृतीतले दादागिरी करणारेच नेते असल्याचे समर्थन राष्ट्रवादीत एकेकाळी असलेले पण सध्या शिवसेनेत असलेले नेते उदय सामंत यांनी केले. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटलांना पत्रकारांबद्दल दिलगिरी व्यक्त करायला लावली. पण ती दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा संजय दिना पाटील यांची मग्रुरी गेली नाही. दोन शिवसेनेच्या भांडणात महाराष्ट्रात शिवीगाळ झाली.

भाजप खासदार – आमदारांचे भांडण चव्हाट्यावर

पण काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीचे लक्षण फक्त दोन शिवसेनेच्या भांडणात दिसले नाही तर ते भाजप आमदार आणि खासदारांच्या भांडणात पण आज उघड्यावर आले. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात सारथी संस्थेच्या कार्यक्रमात भांडण झाले. अभिमन्यू पवारांनी मराठ्यांच्या कार्यक्रमात ब्राह्मण खासदार नको असे म्हणून म्हणे मेधा कुलकर्णींना व्यासपीठावरच्या पहिल्या रांगेतून दुसऱ्या रांगेत बसायला लावले. त्यामुळे चिडून मेधा कुलकर्णी त्या कार्यक्रमातून निघून गेल्या. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात झालेला हा वाद माध्यमांमध्ये पोहोचला. त्यावेळी मेघा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांनी मीडिया लाईव्ह मध्ये एकमेकांवर जोरदार आरोप – प्रत्यारोप केले.

 भाजपमध्ये शिरले काँग्रेसचे अवगुण

अभिमन्यू पवार हे एकेकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी होते. पण आता ते ओएसडी राहिले नसून ते औसा मतदारसंघातले आमदार आहेत पण याचे भान त्यांना राहिले नाही म्हणून त्यांनी सारथी संस्थेच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल ऑफिसरची भूमिका स्वतःहून हातात घेऊन व्यासपीठावरचे क्रम ठरविलेले दिसले. त्यातून मराठा आणि ब्राह्मण या वादाला राजकीय फोडणी मिळाली. महत्वाचे म्हणजे भाजपच्या आमदार आणि खासदारांच्या जाहीर वादामुळे या राजकीय फोडणीचा वास सगळ्या महाराष्ट्रात पसरला. एरवी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि आमदारांमध्ये जाहीर वाद होत असत. त्या पद्धतीचे वाद भाजपमध्ये आमदार – खासदारांनी घालायची पद्धत नव्हती. पण आता वाद घालण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांकडे तेवढे आमदार आणि खासदारच उरलेले नाहीत. त्यांचे सगळे अवगुण भाजपच्या आमदार आणि खासदारांमध्ये उतरलेत. म्हणून तर भाजप महायुतीच्या सरकारच्या राजवटीला काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीची “अवकळा” आली. आमदार खासदारांच्या तोंडी शिव्यांची आणि जातीवादाची भाषा आली!! संस्कारांची भाषा करणाऱ्या संघाच्या शताब्दी वर्षात हे घडलेले दिसले!!

The BJP Grand Alliance government is “disadvantageous” of the Congress-Nationalist Alliance government.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात