विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार फुटल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर राहिले. पण उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले असले तरी आमचे खासदार फुटणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला तब्बल 23 आमदार गैरहजर होते. 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले. अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश होता. या बैठकीला शरद पवार आणि जयंत पाटील हे म्हणे वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत. अनुपस्थित 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावे एबीपी माझा वाहिनीने प्रसिद्ध केली. त्या 16 जणांमध्ये काँग्रेसचे सहा तर ठाकरे आणि पवारांचे प्रत्येकी पाच आमदार गैरहजर होते. एकूण 23 आमदारांनी या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे आता महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण निर्माण झाले. पण शरद पवार यांनी मात्र बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फुटणार नसल्यास दावा केला.
– कारणे अनेक
जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आधी ही बैठक 23 तारखेला ठरली होती. मात्र, ती 24 तारखेला पुढे ढकलण्यात आली. दरम्यानच्या काळात मी दोन लग्नांना उपस्थिती लावणार असल्याचे कबूल केले होते. त्यावेळी पावसाळी अधिवेशन आणि बैठकीबाबत माझ्या लक्षात आले नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले, तर विकास ठाकरे आणि सुनील राऊत यांनीही आपल्याला मतदारसंघात महत्त्वाची कामं असल्याचे सांगितले. आम्ही बैठकीला आलो नाही म्हणजे आम्ही फुटलो असा अर्थ निघत नाही, असेही या दोघांनी सांगितले.
Baramati, Maharashtra | NCP SP Chief Sharad Pawar says, "Shiv Sena UBT MPs have split, none of our MPs will split" pic.twitter.com/s7Ot3iefhi — ANI (@ANI) June 25, 2026
Baramati, Maharashtra | NCP SP Chief Sharad Pawar says, "Shiv Sena UBT MPs have split, none of our MPs will split" pic.twitter.com/s7Ot3iefhi
— ANI (@ANI) June 25, 2026
बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
जयंत पाटील (शरद पवार गट), नाना पटोले (काँग्रेस), विजय वडेट्टीवार (काँग्रेस), अमित देशमुख (काँग्रेस), रोहित पवार (शरद पवार गट), अस्लम शेख (काँग्रेस), संदीप क्षीरसागर (शरद पवार गट), सुनील राऊत (ठाकरे गट), गजानन लवटे (ठाकरे गट), बाबाजी काळे (ठाकरे गट), राहुल पाटील (ठाकरे गट), संजय दरेकर (ठाकरे गट), विश्वजित कदम (काँग्रेस), अभिजीत पाटील (शरद पवार गट), विकास ठाकरे (काँग्रेस)
– महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत का?
महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदार गैरहजर राहिल्याची बाब उद्धव ठाकरे यांनी मात्र गांभीर्याने घेतली. त्यांनी याबाबत तीव्र नाराजी बोलून दाखवली. महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा महाविकास आघाडी म्हणून, विरोधक म्हणून आपण एकी दाखवली पाहिजे. सोबतच राज्यभरातील सभा, बैठका, आंदोलन सुद्धा एकत्रित करायला हवेत, आपली एकी राज्यभर दिसायला हवी. महाविकास आघाडी म्हणून आपण सभागृहात एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App