नागपूर मेट्रो टप्पा – 2 चा विस्तार आणि मुंबईच्या सावरकर सागरी सेतू – वांद्रे किल्ला कनेक्टरला फडणवीस सरकारची मान्यता!!

Fadnavis government

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. नागपूर मेट्रो रेल टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारीत उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यास तसेच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.Fadnavis government

– कनेक्टर रोड साठी 1722.40 कोटी रुपये खर्च

स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूपासून वांद्रे किल्ल्यापर्यंत अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी ₹1722.40 कोटींचा प्रस्ताव पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. हा जोडरस्ता सागरी सेतूपासून वांद्रे किल्याजवळ जोडला जाणार असून तो 3.55 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या कनेक्टरमुळे 20 ते 45 मिनिटांचा प्रवास हा 10 मिनिटांपर्यंत येणार आहे. या जोडरस्त्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.Fadnavis government



– नागपूर टप्पा – 2 मेट्रोला मान्यता

नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल टप्पा2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या उन्नत विस्तारीत मेट्रो रेल्वे मार्गिकेस यावेळी मान्यता देण्यात आली आहे. ही मार्गिका सुमारे 1.40 कि.मी. असून त्यावर 1 उन्नत स्थानक असणार आहे. एकूण ₹310.35 कोटी इतक्या प्रकल्प पूर्णत्व किंमतीच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत करण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पास केंद्रशासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Fadnavis government approves the expansion of Nagpur Metro Phase-2 and the Savarkar Sagari Setu-Bandra Fort connector in Mumbai!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात