भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी; जुन्या संस्कारांची उफाळली दादागिरी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी; जुन्या संस्कारांची उफाळली दादागिरी!!, असला प्रकार आज समोर आला. Sanjay Dina Patil

संजय दिना पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले. पण त्यांची मुलगी नगरसेविका राजुल पाटील हिने सध्यातरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणे पसंत केले. कारण ती एकटी फुटली तर तिचे नगरसेवक पद जाईल, याची भीती पाटलांना वाटली. पण त्याच मुद्द्यावरून आणि संजय दिना पाटलांच्या संजय राऊतांशी झालेल्या भांडणावरून पत्रकारांनी संजय दिना पाटलांना परखड प्रश्न विचारल्यावर त्यांनी पत्रकारांवर दादागिरी केली. पत्रकारांना शिवीगाळ करून मारायची धमकी दिली.

माध्यमांशी संवाद साधताना संजय दिना पाटील भडकले आणि रागाच्या भरात त्यांची जीभ चांगलीच घसरली. संजय दिना पाटलांनी पत्रकारांवर अरेरावी करून त्यांना शिवीगाळही केली. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय पाटलांनी अर्वाच्च भाषा वापरली. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्रकारांना मारण्याची भाषा करत धमकीही दिली.

मुलीच्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर भडकले

संजय दिना पाटलांनी संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. शिंदे आपल्यावर नाराज नाही तर त्यांनी शाबासकी दिली असं सांगत संजय दिना पाटील हे विविध विषायंवर बोलले. मात्र बराच वेळ बोलून झाल्यावर ते निघत असताना एका पत्रकाराने त्यांना राजूल पाटील नक्की कुठे यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. रागाच्या भरात बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी माध्यमांना शिवीगाळ करत थेट धमकी दिली.

माझं हे बघू नका तुम्ही, अती करताय. ए भाई बस ना,  बंद कर ना आता, बंद कर नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे तर तुम्ही काय आहे ते… अशा शब्दांत संजय दिना पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी शांततेची भूमिका स्वीकारत हो, हो असं म्हटलं, आम्ही चाललोय असं सांगितलं,  तरीही संजय दिना पाटील यांची मग्रुरी, त्यांचा माज कायम होता.



वारंवार शिवीगाळ  

मी इज्जत करतो,  इज्जत करा सांगतोय परत XXXXXXXX… असं म्हणत त्यांनी पत्रकारांसमोरच शिव्यांची लाखोली वाहिली.  मी इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उभं करतोय तुम्हाला, जेवायला देतोय . काय, उगाच त्यांच्याकडे जाल. परत आला ना तर मारून पाठवणार तुम्हाला, जे बोलायचं, जे लिहायचं ते लिहा, अशी थेट धमकीही  संजय दिना पाटील यांनी दिली.

एवढंच नव्हे तर, लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे…  कमिशनरकडे जाऊन कम्प्लेंट करा अशी मग्रुरीही त्यांनी दाखवली. इज्जत करतो, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला XXX घुसताय… अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची.. बोललीय ना ती.. सागितलं ना सर्व… त्याने काही बोलू दे.. अरे काही बोलू दे.. तुझ्या XXXXX XXXX  गेलं  असं म्हणत, रेकॉर्ड करा आणि सांगा ,  तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार ..अशा शब्दांत संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच रोष पसरला असून विरोधकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

दादागिरीचा इतिहास जुना

संजय दिना पाटलांच्या दादागिरीचा इतिहास जुनाच आहे. त्यांचे मूळचे राजकीय संस्कार काँग्रेस – राष्ट्रवादीचे आहेत. 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्याच्या आधीपासून त्यांची दादागिरी विशिष्ट ठिकाणी चालत असे. तिच्यात नंतरही कधी फारसा बदल झाल्याचे दिसून आले नाही. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर सुद्धा त्यांनी दादागिरी केली.

Emboldened by the BJP’s hold on power, MP Sanjay Dina Patil behaves arrogantly towards journalists.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात