Philippines : फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतरही धडकी भरवणारी स्थिती; 2,100 हून अधिक आफ्टरशॉक्स, मृतांचा आकडा 45 वर

Philippines

वृत्तसंस्था

मनिला : Philippines  फिलिपिन्सच्या दक्षिण भागात आलेल्या शक्तिशाली 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर दोन दिवस उलटून गेले असले, तरी परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. मुख्य भूकंपानंतर सतत येणाऱ्या आफ्टरशॉक्समुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 2,100 हून अधिक आफ्टरशॉक्सची नोंद झाली असून मृतांचा आकडा 45 वर पोहोचला आहे.Philippines

याशिवाय 630 हून अधिक लोक जखमी झाले असून 17 जण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असले तरी सततच्या धक्क्यांमुळे त्यात अडथळे निर्माण होत आहेत.Philippines



बचावकार्यादरम्यान पुन्हा जोरदार धक्का

बुधवारी जनरल सँटोस शहरातील एका कोसळलेल्या इमारतीत बचावकार्य सुरू असताना पुन्हा एकदा जोरदार आफ्टरशॉक जाणवला. त्यामुळे बचाव पथकांना तातडीने घटनास्थळ सोडावे लागले.

धक्क्यानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याचे काही भाग पुन्हा कोसळू लागल्याने बचावकर्त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी शोधमोहीम काही काळासाठी थांबवावी लागली.

25 हजारांहून अधिक नागरिक मदत शिबिरांमध्ये

सततच्या धक्क्यांमुळे नागरिक आपल्या घरांमध्ये परतण्यास घाबरत आहेत. अनेक इमारतींना तडे गेले असून काही इमारती कोसळण्याच्या स्थितीत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यामुळे 25 हजारांहून अधिक नागरिक सध्या विविध तात्पुरत्या मदत शिबिरांमध्ये राहत आहेत. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.

हजारो घरे, रस्ते आणि पूल बाधित

भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. 3,100 हून अधिक घरे नुकसानग्रस्त, डझनभर रस्ते बाधित, अनेक पूल खराब, जनरल सँटोस विमानतळाचे नुकसान व काही भागांतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. विमानतळाला झालेल्या नुकसानीमुळे काही उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

आफ्टरशॉक्स आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता

भूकंपतज्ज्ञांच्या मते, हा फिलिपिन्समध्ये गेल्या अनेक दशकांतील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक मानला जात आहे.

मुख्य भूकंपानंतर हजारो आफ्टरशॉक्स येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही धक्के अत्यंत तीव्र असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Over 2,100 Aftershocks Rattles Philippines After 7.8 Magnitude Earthquake; Death Toll Reaches 45

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात