नाशिक : देशाचे सर्वाधिक काळ सलग राहिलेले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मागे टाकला. संपूर्ण देशभर त्याचे सेलिब्रेशन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारे मेसेज जगभरातल्या नेत्यांनी केले तर अनेक नेत्यांनी विशेष लेख लिहून मोदींच्या कारकिर्दीची स्तुती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक भारत मंडप मध्ये घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळाने विशेष ठराव करून त्यांचे अभिनंदन केले.
पण मोदींच्या या सलग तपपूर्तीच्या निमित्ताने एक वेगळाच फोटो सगळ्यांसमोर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मोदींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले.
– PMO जबरदस्त प्रबळ आणि प्रभावी, पण…
एरवी पंतप्रधान कार्यालयाचा फोटो किंवा पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फोटो असा एकत्र कधीच समोर येत नाही. पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी पडद्यामागे राहून काम करतात आणि पंतप्रधान कार्यालय जबरदस्त प्रबळ आणि प्रभावी असल्याचे वेगवेगळ्या निर्णयांमधून दाखवून देत असतात.
– PMO मध्ये 300 पेक्षा जास्त कर्मचारी
भारताच्या पंतप्रधान कार्यालयात सध्या 300 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. पण त्यापैकी एक दोन सचिव वगळता अन्य कुणीही अधिकारी आणि कार्यकर्ते कधी जनतेसमोर उघडपणे आलेले दिसले नाहीत. पंतप्रधानांच्या सचिवांची संख्याच 15 पेक्षा जास्त आहे. उपसचिव, अतिरिक्त सचिव, वैयक्तिक सचिव यांची संख्या त्यापेक्षा वेगळी आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य सचिव क्रमांक दोन शक्तिकांत दास, पंतप्रधानांच्या वैयक्तिक सचिव निधी तिवारी यांच्या खेरीज बाकीचे सचिव किंवा अधिकारी लोकांना माहिती सुद्धा नाहीत. कारण त्यांचा थेट लोकांशी संबंध सुद्धा येत नाही. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळ्यांवरच्या अत्यंत छोट्या घटना ते अत्यंत मोठ्या घटनांविषयी पंतप्रधानांना अपडेट ठेवणे आणि पंतप्रधानांचे निर्णय सर्व दूर पोहोचविणे, यात पंतप्रधान कार्यालयाची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका आहे. हे काम पंतप्रधान कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचारी बिनबोभाट करत असतात.
पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीच्या तपपुर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान कार्यालयातील सगळे अधिकारी आणि कर्मचारी एकत्र जमले आणि त्यांनी नरेंद्र मोदींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी या सगळ्यांचा एकत्रित फोटो काढण्यात आला. तो एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला त्यामुळे पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्मिळ दर्शन जाहीरपणे झाले, जे एरवी क्वचितच कदाचित घडू शकले असते!!
Officers of the Prime Minister’s Office congratulated PM Modi on becoming the longest-serving democratically elected Prime Minister of India in consecutive terms. Over the last twelve years, he has provided leadership characterised by stability, transparency and a steadfast… pic.twitter.com/MMgN4CbBoV — ANI (@ANI) June 10, 2026
Officers of the Prime Minister’s Office congratulated PM Modi on becoming the longest-serving democratically elected Prime Minister of India in consecutive terms.
Over the last twelve years, he has provided leadership characterised by stability, transparency and a steadfast… pic.twitter.com/MMgN4CbBoV
— ANI (@ANI) June 10, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App