जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 114 पदके जिंकत अव्वल स्थान पटकावले. समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली. हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण ठरला.

भारताच्या योगसामर्थ्याची जागतिक स्तरावर छाप उमटविणारे सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपले अथक परिश्रम, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर भारताने योग क्षेत्रातील आपले विश्वगुरूचे स्थान पुन्हा अधोरेखित केले आहे.

भारताच्या या देदिप्यमान यशातून युवा पिढीला योग, शिस्त आणि निरोगी जीवनाचा प्रेरणादायी संदेश मिळेल, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

-79 देशांचा सहभाग

79 देशांनी या योगासन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. 31 देशांनी पदके जिंकली. नेपाळने एक सुवर्ण, 36 रौप्य, तर १५ कांस्य पदके जिंकली.

India won a total of 114 medals comprising 102 gold, 9 silver, and 3 bronze at the World Yogasana Championship.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात